📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मे महिन्यात महिन्यात शेवगाव आगाराला मिळाले ३ कोटी ३३ लाखाचे उत्पन्न !!!

मे महिन्यात महिन्यात शेवगाव आगाराला मिळाले ३ कोटी ३३ लाखाचे उत्पन्न !!!

अहिल्या नगर:-अहिल्या नगर जिल्ह्यातील पहिले आगार व मराठवाड्याचे प्रवेशदार म्हणून ख्याती असलेल्या राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या शेवगाव आगाराने यंदा मे महिन्यात विक्रमी चांगली आर्थिक कामगिरी केली आहे. मे महिन्यात शेवगाव आगाराला तब्बल ३ कोटी ३३ लाख रुपये इतके घसघशीत उत्पन्न मिळाले असून सुमारे सहा लाख ४७ हजार रुपये इतका नफा झाला असल्याची माहिती आगार प्रमुख अमोल कोतकर यांनी दिली. यासाठी आगाराच्या बसेसने ५ लाख ६१ हजार किलोमीटर आंतराचा प्रवास करून सुमारे ४ लाख ७३ हजार प्रवाशांना प्रवासाची सेवा दिली. त्यात ७५ वर्षावरील अमृत ज्येष्ठ प्रवासी १३ हजार ३६३, महिला प्रवासी एक लाख ५९ हजार ८०६ ६५ वर्षा वरील ज्येष्ठ प्रवासी १५ हजार ६६ तसेच इतर सवलत प्रवाशी १३ हजार ६६८ तसेच तांत्रिक शिक्षण घेणारे विद्यार्थी ३३४, यांनी लाभ घेतला मे महिन्यात लग्नसराई शाळा महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी तसेच विविध धार्मिक यात्रांचा हंगाम असतो. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वाढ होते या काळात शेवगाव
आगारातून छत्रपती संभाजीनगर गेवराई अहिल्यानगर नाशिक पुणे मार्गावर विशेष गाड्यांची सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. शेवगाव आगाराला नवीन दहा भारत स्टेज (बी. एस. व्ही. आय. मानांकनाच्या बसेस मिळाल्यामुळे पुणे नाशिक मुंबई छत्रपती संभाजी नगर अशा लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बसेस मध्ये वाढ करण्यात आली आहे. या सर्व मार्गावरील प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे महसुलात मोठी वाढ झाली शेवगाव आगारास अहिल्यानगर परिवहन विभागचे अधिकाऱ्यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्याची फलश्रुती म्हणून आगाराला मे २०२५ मध्ये नफा मिळाला. पुढील महिन्यात ६ जुलैला आषाढी एकादशी असल्याने २५ जून पासून पंढरपूर साठी विशेष बसेस सोडण्यात येणार असून शेवगाव तालुक्यातील कोणत्याही गावातून ४४ भाविकांचा गट उपलब्ध झाल्यास थेट त्या गावातून पंढरपूर साठी बस उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती आगार व्यवस्थापक अमोल कोतकर यांनी दिली. अहिल्यानगर परिवहन विभाग नियंत्रक श्री. राजेंद्र जगताप यंत्र अभियंता श्री. अविनाश साखरे, विभागीय वाहतूक अधिकारी चंद्रकांत चौधरी पालक अधिकारी संकेत राजहंस सुरक्षा अधिकारी धर्मराज पाटील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले त्याची फलश्रुती म्हणून आगाराला मे २०२५ मध्ये नफा मिळाला. या यशाबद्दल शेवगाव आगारच्या सर्व अधिकरी कार्यालयीन कर्मचारी चालक वाहक यांचे अभिनंदन

*पुढील महिन्यात ६ जुलैला आषाढी एकादशी असल्याने २५ जून पासून पंढरपूर साठी विशेष बसेस सोडण्यात येणार असून शेवगाव तालुक्यातील कोणत्याही गावातून ४४ भाविकांचा गट उपलब्ध झाल्यास थेट त्या गावातून पंढरपूर साठी बस उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती आगार व्यवस्थापक अमोल कोतकर यांनी दिली

Back to top button