जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे दोन कुटुंबांवर काळाचा घाला सावरगावात घर कोसळल्याने गौतम गोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू

जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे दोन कुटुंबांवर काळाचा घाला
सावरगावात घर कोसळल्याने गौतम गोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.पावसामुळे दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव उंडा येथील पारूबाई किसन गव्हाणे या वृध्द महिलेचा भिंत अंगावर कोसळून मृत्यू झाला होता. तर दि. २२ सप्टेंबर रोजी सावरगाव येथे घर कोसळून तीन जण जखमी झाले होते. दुसर्या घटनेत सावरगाव येथील गौतम गोरे यांचया दहा उपचार नंतर अखेर मृत्यू झाला आहे.बाबासाहेब गोरे (वय ४०) यांच्या डोक्यावर व डोळ्यावर बीम पडला होता. त्यामुळे प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नगर येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.दिवसांच्या उपचारानंतर अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे सावरगाव परिसरात शोककळा पसरली आहे. जामखेड तालुक्यातील सावरगाव येथे दि. २१ रोजी गौतम बाबासाहेब गोरे हे रात्री आपल्या घरात कुटुंबासमवेत झोपलेले रविवारी दि. २२ रोजी पहाटे साडेचार वाजता घर कोसळले यात स्वतः पत्नी व मुलगा तीघे जखमी झाले होते. यातील गौतम गौरे यांना जास्त मार लागला होता.बीम कोसळला होता ते गंभीर जखमी झाले होते. दहा दिवस ते नगर येथे उपचार घेत होते. मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.शोकाकुल वातावरणात सावरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत गौतम गोरे यांची घरची परिस्थिती गरीब असून लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थामधून होत आहे


