लिंबागणेश पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा कृषी पंपासाठी दिवसा विद्युत पुरवठ्याची मागणी मान्य – उद्याचा रास्तारोको आंदोलन स्थगित राजेंद्र मस्के (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट) यांची प्रमुख उपस्थिती :- डॉ. गणेश ढवळे

कृषी पंपासाठी दिवसा विद्युत पुरवठ्याची मागणी मान्य – उद्याचा रास्तारोको आंदोलन स्थगित
राजेंद्र मस्के (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट) यांची प्रमुख उपस्थिती
:- डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश :– (दि.१०)
लिंबागणेश परिसरात बिबट्या आढळून आल्याने पिंपरनई, पोखरी (घाट), बेलगाव, सोमनाथवाडी, मसेवाडी, मोरगाव-फुकेवाडी, काळेवाडी, गणेशनगर अशा पंचक्रोशीतील गावांमध्ये ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शेतकऱ्यांना रात्री कृषी पंप सुरू असताना पिकांना पाणी देण्यासाठी अंधारात शेतात जाण्याचा धोका वाढत होता. बिबट्याचा वावर लक्षात घेता त्यांच्या जीवितास गंभीर संकट निर्माण होत असल्यामुळे कृषी पंपासाठी दिवसा नियमित वीजपुरवठ्याची मागणी जोर धरत होती.
या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी उद्या (दि.११) लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला होता.
—
अभियंत्यांसोबत चर्चेला सकारात्मक प्रतिसाद – मागणी मान्य
आज (दि.१०) सकाळी महावितरण उपकेंद्र लिंबागणेश येथे सहाय्यक अभियंता महेश गायकवाड यांच्याशी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांसोबत चर्चा झाली. ग्रामस्थांची अडचण समजून घेत त्यांनी कृषी पंपांसाठी रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा देण्यास मान्यता दिली.
यामुळे उद्या होणारे रास्तारोको आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. गणेश ढवळे यांनी दिली.
—
बैठकीत मान्यवरांची उपस्थिती
या चर्चेला आणि मागणीसाठी पुढाकार घेण्यात राजेंद्र मस्के (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गट) यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याबाबत त्यांनी सहाय्यक अभियंता, उपकेंद्र लिंबागणेश आणि उपकार्यकारी अभियंता, बीड ग्रामीण विभाग यांना पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा केला आहे.
—
उपस्थित मान्यवर
या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये –
बालासाहेब जाधव (सरपंच), राजेभाऊ आप्पा गिरे (माजी पंचायत समिती सदस्य), कल्याण वाणी (माजी सरपंच), रविंद्र निर्मळ (चेअरमन, सेवा सोसायटी), पत्रकार हरिओम क्षीरसागर, दामोदर थोरात, मोहन कोटुळे, बिभीषण मुळीक (सरपंच, पोखरी), बाळासाहेब वायभट (सरपंच, पिंपरनई), शहादेव कोल्हे, पांडुरंग वाणी, अँड. गणेश वाणी, विक्रांत वाणी, सुरेश निर्मळ, संतोष भोसले, अभिजित गायकवाड, सर्पमित्र अशोक जाधव, संतोष वाणी, संजय सुकाळे, तुकाराम गायकवाड, अंबादास ढास, अजित मंडलिक, बिभीषण वाणी, घाडगे गणेश, मुळे जीवन, सचिन गिरे, आरूण निर्मळ, रामदास मुळे, बंकट लगास, विलास वायभट, अभिमान वाणी, कृष्णा वायभट, रविंद्र ढास यांचा समावेश होता.
—



