मुंबई

अनिल देशमुखांची दिवाळी जाणार ईडी कारागृहात ?

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रात्री सक्तवसुली संचनालयाने अटक केल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची दिवाळी कारागृहातच होणार आहे. ईडीच्या वकिलांनी अनिल देशमुख यांची १४ दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी न्यायालयात केली होती. त्यानंतर दोन्ही बाजुंकडून झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे.

१०० कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. १०० कोटी वसुलीप्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते.

अनिल देशमुख यांना ५ वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर 1 नोव्हेबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले.

Back to top button