मुंबई

पुन्हा मुंबईत तीन मजली घर कोसळले, १२ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले !

 

मुंबई | अँटॉप हिल येथील जय महाराष्ट्र नगरमध्ये तीन मजली घर कोसळून मोठी दुर्घटना घडली. सकाळी सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली.या दुर्घटनेत १२ जण मातीच्या ढिगाऱ्या खाली दबले गेले होते. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत 12 जणांची सुटका करण्यात आली आहे. किरकोळ जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे आसपासच्या रहिवाशांमध्येही घबराट पसरली आहे.

Back to top button