महाराष्ट्र

‘कुबूल कुबूल कुबूल… आता मुख्यमंत्र्यांनीच मलिकांविरुद्ध FIR दाखल करावा’

 

काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असा गंभीर आरोप करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकाच खळबळ उडवून दिली होती. तर दुसरीकडे नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देत, मी उद्या सकाळी अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबतचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे म्हटले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध उघड केले आहेत. मलिक यांनी देशाच्या गुन्हेगारांसोबत केलेले व्यवहार पुराव्यानिशी समोर आले आहे. आता मुख्यमंत्री व त्यांच्या पक्षाचे प्रमुख मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का?, असा सवाल भाजपने विचारला आहे. तसेच, मुख्यंत्र्यांनी आता मलिकांविरुद्ध FIR दाखल करावा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

मुंबईत स्वत:ची खोलीसुद्धा मालकी हक्कावर मिळवण्यासाठी मालक तयार नसतो, अशी अनेक उदाहरणं मुंबईत आहेत. पण, नवाबी भाडेकरू असा नवीन झालाय, ते ज्या इमारतीत भाडेकरू होते, ती इमारत तर दिलीच, अजून दोन इमारती दिल्या, झोपडपट्टी दिली, मोकळ्या जागा दिल्या तेही ३० लाखात. त्यापैकी, २० लाख रुपयेच दिले, असे नवाबी भाडेकरू मुंबईत शोधून सापडणार नाहीत.

हा मुंबईतील भाडेकरूंचा अपमान आहे. तर, सरदार शहावली खान हा वॉचमन असल्याचं मलिकांनी सांगितलं. मुंबईतील वॉचमनला हा नवीन धंदा शिकवतायंत का, वॉचमन आता इमारतीच्या जागेवर, ७/१२ वर कुठलाही व्यवहार न करता, पैसे न देता नाव चढवू शकतात. नवाबी भाडेकरू, नवाबी दर आणि नवाबी धंदा, यावर मुंबईकर विश्वास ठेवूच शकत नाही, असे आशिष शेलार यांनी म्हटलं.

Back to top button