बीड
रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची श्री ज्ञानेश्वर विद्यालयास सदिच्छा भेट

रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची श्री ज्ञानेश्वर विद्यालयास सदिच्छा भेट
आळंदी देवाची : रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. भरतशेठ गोगावले यांनी श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यु.कॉलेजला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे विद्यालयाच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांनी संस्थेच्या सर्व घटकांच्या वतीने भरतशेठ गोगावले यांचा शाल,श्रीफळ , हार ,मोत्याची माळ व माऊलींची मूर्ती देऊन सन्मान केला. आळंदी एकादशीच्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन भूमीत झालेल्या या सदिच्छा भेटीच्या निमित्ताने शिक्षण, संस्कार व सामाजिक बांधिलकीच्या कार्याला अधिक बळ मिळावे, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
“शिक्षणातून संस्कार, संस्कारातून सक्षम समाज” या विचाराने कार्यरत असलेल्या श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेसाठी ही सदिच्छा भेट प्रेरणादायी ठरली.
याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, सदस्य अनिल वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य किसान राठोड, उपप्राचार्य प्रशांत सोनवणे, पर्यवेक्षिका अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.



