बीड

खेळातून जीवन घडते, त्यासाठी मैदानावर खेळा – महेश दाभाडे

खेळातून जीवन घडते, त्यासाठी मैदानावर खेळा – महेश दाभाडे
रणवीर पंडित यांच्या नेतृत्वाखाली ॲथलेटिक्स स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

गेवराई दि. २ (प्रतिनिधी) शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांनी विद्यार्थ्यांसाठी मोठी क्रिडा चळवळ सुरू केली आहे, क्रीडा क्षेत्रासाठी झटणा-या क्रीडा नेतृत्व रणवीर पंडित यांना ताकद द्या. खेळामुळे आपले जीवन घडते. मोबाईलचा नाद सोडून मैदानावर खेळा आणि आपले जीवन आणि करिअर घडवा असे आवाहन माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांनी केले. क्रीडा महोत्सवात मुलांच्या गटातील ॲथलेटिक्स स्पर्धांचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्था अंतर्गत सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवात शिवाजीनगर गढी येथील शिवशारदा पब्लिक स्कूलच्या भव्य मैदानावर शनिवार दिनांक ३ जानेवारी रोजी मुलांच्या गटात ॲथलेटिक्स स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी  नगराध्यक्ष महेश दाभाडे नवनिर्वाचित नगरसेवक, दादासाहेब घोडके, युवा कार्यकर्ते शहारुख पठाण,शाम रुचकर, सय्यद मोसिन, शेख अहमद यांच्यासह सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रिडा ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्तिक वाघ या विद्यार्थ्यांने खेळाडूंना शपथ दिली. क्रीडा महोत्सवामध्ये क्रीडा संस्थेच्या १८ शाळेचे संघ सहभागी झाले आहे.मुलांच्या चार गटात लांब उडी, धावणे, गोळा फेक आदी स्पर्धा होणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य वसंत राठोड यांनी केले. सुत्रसंचलन यश धुमक, सार्थक समुद्रे यांनी केले.

यावेळी जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहप्रशासन अधिकारी प्रा. गोगुले, प्राचार्य संतोषकुमार अन्नम, शिवशारदा पब्लिक स्कूलचे प्रशासकीय अधिकारी अनंत डावकर, माजी मुख्याध्यापक राजेंद्र घुंबार्डे, मुख्याध्यापक मुरलीधर पवार, अशोक तौर, भक्तराज पौळ, रणजीत सानप, सय्यद युनुस, भागवत राऊत, विश्वनाथ पवार, अंकुश राठोड, शिवाजी पाटोळे, अरुण हाटकर, उदय पाठक, सतिश गरड, सदाशिव गंगाधर यांच्यासह स्पर्धेचे पंच  विनोद देशपांडे, किशोर कांबळे, ॲलन जाजू, बेलार्मिन सर, श्रीनाथ सर, विजय कोकाटे, ज्ञानेश्वर धापसे, आर्दड धीरज, निशिकांत पंडित, ढोबळे श्रीकांत, विशाल ठाकूर, भगवान डावकर, चंद्रकांत नवपुते, भोसले सर, पाटील ऋतुराज तसेच क्रीडा शिक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, क्रीडाप्रेमी नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Back to top button