गुडघा-खुबा प्रत्यारोपणाची सुवर्णसंधी; बीडमध्ये १३ सप्टेंबरला भव्य अस्थिरोग शिबिर

गुडघा-खुबा प्रत्यारोपणाची सुवर्णसंधी; बीडमध्ये १३ सप्टेंबरला भव्य अस्थिरोग शिबिर
बीड (प्रतिनिधी) | दि. १३ सप्टेंबर २०२६ (रविवार)
सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी तसेच मणक्यांच्या विकारांनी त्रस्त रुग्णांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल, बीड येथे रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत भव्य अस्थिरोग तपासणी व शस्त्रक्रिया मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने व संत आदर्श ऋषीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जैन सोशल फेडरेशनच्या वतीने आयोजित या शिबिरात अहमदनगर येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. रोहन धोत्रे व त्यांची अनुभवी टीम रुग्णांची तपासणी करणार आहे.
शिबिरात गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबर-पाठदुखी, मणक्यांचे विकार, चालताना त्रास, हात-पाय बधिर होणे, जुने फ्रॅक्चर तसेच सांधे झिजणे आदी आजारांवर तज्ज्ञांकडून तपासणी व उपचाराचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संपूर्ण गुडघा व खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गुणवत्तापूर्ण इम्प्लांटसह केवळ ₹६५,००० मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पात्र रुग्णांना MJPJAY अंतर्गत मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळणार असून, अपात्र रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
शिबिरात एक्स-रे ₹२५०, CT स्कॅन ₹१,००० आणि MRI ₹१,७५० या सवलतीच्या दरात उपलब्ध राहणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी तपासणी शुल्क केवळ ₹१०० ठेवण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
📞 संपर्क : ९८५००७७३६१ / ८२६२००९०९१



