नाशिक

कांदा व्यापाऱ्यांकडे सापडलं १०० कोटींची रक्कम आयकर विभागाला नोटा मोजायला लागला इतका वेळ

 

नाशिक | एजकीकडे कोरोनाच्या अप्र्श्वभूमीवर अनेकांच्या नोकिया गेल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली असताना दुसरीकडे मात्र काही वैरी मात्र चांगलेच धनवान झालेले दिसून येत आहे. तीने पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील ६ कांदा व्यापाऱ्यांच्या १३ ठिकाणी गुरुवारी छापे टाकण्यात आले होते. सुमारे दीडशे ते दोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या व्यापाऱ्यांचं कार्यालय आणि बँक खात्यांची तपासणी केली.

कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाला २६ कोटींहून अधिक रोख रक्कम आणि सुमारे १०० कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सुमारे दीडशे ते दोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या व्यापाऱ्यांचे कार्यालय आणि बँक खात्यांची तपासणी केली. आयकर विभागाने रोख रक्कमही जप्त केली. या कारवाईमुळे राज्यभरातील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

मात्र दुसरीकडे अनेक व्यापारी आणि राजकीय नेत्यांंनीही या कारवाईवर आक्षेप घेत कारवाईसाठी निवडलेली वेळ चुकीचं असल्याचं म्हटलं. कारवाईवर माजी आमदार मारोतराव पवार यांनी आक्षेप घेतला आहे. जेव्हा कांद्याचे भाव वाढतात. शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे जास्त येतात, तेव्हाच अशी कारवाई का केली जाते, असा सवाल त्यांनी केला आहे.

Back to top button