बीड

जामखेड नगर परिषद प्रभाग २ व ४ मध्ये प्रचाराला वेग

जामखेड नगर परिषद प्रभाग २ व ४ मध्ये प्रचाराला वेग

आ.रोहित पवार व सभापती प्रा.राम शिंदे प्रचारात सक्रिय

जामखेड प्रतिनिधी : जामखेड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक २ व प्रभाग क्रमांक ४ मधील पोटनिवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. थेट दिग्गज नेते मैदानात उतरल्याने ही निवडणूक अटीतटीची होत असल्याचे चित्र आहे.

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली एकीकडे प्रचाराची धुरा सांभाळली जात असताना, दुसरीकडे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे गल्लीबोळात, घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधत प्रचार करताना दिसत आहेत. दोन्ही नेते स्वतः प्रचारात सक्रिय असल्याने निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्रचारादरम्यान आमदार रोहित पवार व प्रा. राम शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची धार वाढली असून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. त्यामुळे प्रचार अधिकच रंगतदार झाला आहे.दरम्यान, या निवडणुकीचा निकाल केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर राज्य व देशभरातही चर्चेचा विषय ठरणार असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button