📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
संपादकीय

बारा बलुतेदार महासंघाच्यावतीने शिवरत्न जिवाजी महाले यांना अभिवादन

बीड (प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती बारा बलुतेदार महासंघाच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणण परिसरात असलेल्या शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यास बारा बलुतेदार महासंघाच्यावतीने दि. 9 ऑक्टोबर रोजी अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन सभेस बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी जिवाजी महाले यांच्या जीवन चरित्राची माहिती उपस्थितांना दिली.  यावेळी बीड जिल्हा बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा भावसार समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रकाशराव कानगांवकर, साळी समाज जिल्हाध्यक्ष राजु ताटे, भटक्या विमुक्त जमातीचे डॉ.रमेश कैवाडे, नाभिक समाजाचे गुलाब चव्हाण, किशोर शिंदे, एसबीसी संघटनेचे मुकेश शिवगण, परिट धोबी समाजाचे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर जाधव, रमेश घोडके, कोष्टी समाजाचे सुरेश असलेकर, रवी म्हेत्रे, एसबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दगडू म्हेत्रे, लोहार संघटनेचे अशोक आणेराव, भोई  समाजाचे जिल्हाध्यक्ष संजय घेणे, दत्ता गुणवंत, गुरव समाजाचे जिल्हाध्यक्ष संजय गुरव, लोणार समाजाचे जिल्हाध्यक्ष अनिल मुळे, मुस्लिम ओबीसी परिषदेचे रफिक बागवान, सुतार समाजाचे जिल्हाध्यक्ष बापुराव भालेकर वाणी समाजाचे योगेश जी कानडे कुंभार समाजांचे धर्मा  भाऊ करडकर गोसावी परिशदेचे अ‍ॅड.बन, जंगम समाजाचे उमेश स्वामी यांच्यासह बारा बलुतेदार महासंघाचे सर्व पदाधिकारी यांच्यासहसमाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button