बीड

बीड नगराध्यक्ष पदासाठी दिव्या स्वामी यांचा उमेदवारी अर्ज वैद्य

बीड नगराध्यक्ष पदासाठी दिव्या स्वामी यांचा उमेदवारी अर्ज वैद्य
बीड प्रतिनिधी:-बीड नगराध्यक्ष पदासाठी सुशिक्षित तरुण उमेदवार म्हणून कु. दिव्या महेश स्वामी यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वैद्य ठरवला आहे.
बीड नगराध्यक्ष पदासाठी अतिशय सामान्य कुटुंबातील सुशिक्षित एम एस सी ऍग्री चे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या कुमारी दिव्या महेश स्वामी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा उमेदवारी अर्ज अनुसूचित जाती महिला प्रवर्गामधून निवडणूक निर्णय अधिकारी कविता जाधव यांनी वैद्य ठरवला आहे. त्यामुळे त्या आता बीड नगराध्यक्ष पदाची निवडणूक हिमतेने लढवणार आहेत.वीरशैव लिंगायत समाजासह सर्व समाजातून या सामान्य कुटुंबातील उमेदवाराला नगराध्यक्ष म्हणून स्वीकारले आहे. या उमेदवारीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. त्या केज विधानसभा मतदार संघाचे पहिले आमदार ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कै. रामलिंग स्वामी यांच्या नात असून केज विधानसभेची निवडणूक दोन वेळा लढवलेले पत्रकार आणि समाजसेवक म्हणून परिचित असलेले वैभव स्वामी यांच्या त्या बहीण आहेत. यामुळे त्यांना मतदार स्वीकारतील असा विश्वास बीडच्या सामान्य मतदारांमधून व्यक्त होत आहे.
Back to top button