बीड
पत्रकार संघाच्या वतीने बीड जिल्हा रुग्णालयाला साड्या आणि लहान मुलीस ड्रेस भेट

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या आव्हानाला प्रतिसाद
बीड प्रतिनिधी:-बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार,तुरे, शाल, पुष्पगुच्छ न स्वीकारता जिल्हा रुग्णालयामध्ये ज्या माता कन्येला जन्म देतील त्या कन्येचे आणि त्या मातेचे जिने कन्यारत्न दिले त्यांचे स्वागत करण्यासाठी त्या मातेला साडी चोळी भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई अंतर्गत बीड जिल्हा शाखेच्या वतीने साडी आणि चिमुकल्या मुलींसाठी ड्रेस भेट स्वरूपात देऊन जिल्हाशलचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचे अनोखे अभिष्टचिंतन करण्यात आले.
बीडचे कर्तव्यदक्ष जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी बीड येथे पदभार घेताच बीड जिल्ह्यातील मुलींचा दर वाढावा यासाठी विविध उपाय योजना आणि त्यानुसार जनजागृती प्रित्यर्थ आवाहन सुरू केले. त्याचाच भाग म्हणून त्यांनी त्यांच्या स्वागताला येणाऱ्या मान्यवरांना विनंती करत हारतुरे न देता साडीचोळी भेट देण्याचे आवाहन केले होते.त्या आवाहनानुसार 500 पेक्षा अधिक साड्या जिल्हा रुग्णालयात जमा झाल्या. सदरील आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादानंतर त्यांनी 14 मार्च रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित हारतुरे, शाल, श्रीफळ न स्वीकारता पुन्हा एकदा साड्या भेट देण्याचे आवाहन केले. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा बीडच्या वतीने त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून ज्या माता कन्येला जन्म देतील त्या मातेला साडी आणि त्या जन्मदात्या चिमुकलेला ड्रेस प्रातिनिधिक स्वरूपामध्ये भेट म्हणून देण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्यासह बीड जिल्हाध्यक्ष अमजद खान, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे बीड जिल्हाध्यक्ष शेख ताहेर,महिला जिल्हाध्यक्ष शेख आयेशा,बीड जिल्हा संघटक रईस खान,उपाध्यक्ष दत्ता काटे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, काळजीवाहक शेख शाहेद सह इतर पदाधिकारी आणि ज्येष्ठ नेत्या शैलाताई मुसळे यांची विशेष उपस्थिती होती.

चौकट…
6 जानेवारी दर्पण दिन पत्रकार संघाने दत्तक घेतला
यापुढे दर 6 जानेवारी मराठी दर्पण दिनाचे औचित्य साधून यादिवशी बीड जिल्हा रुग्णालयात ज्या माता कन्येला जन्म देतील त्या मातेला साडी चोळी आणि त्या चिमुकलीला ड्रेस कायम देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा बीड आणि जगदविवेक प्रतिष्ठानच्या वतीने देण्याचा निर्णय पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जाहीर केला.याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.