महाराष्ट्र

आम्ही काही पेल्याबिल्यात पित नाहीत, संजय राऊतांनी लगावला विरोधकांना टोला

 

राज्यात महाविक्स आघाडीचे सरकार स्थापन झालेले असले तरी दुसरीकडे स्थानिक पातळीवर वाद होत असल्याचे चित्र दिसून आले होते. त्यातच नाशिक महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात वाद होत असल्याचे चित्र दिसून आले होते. त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादावर भाष्य करताना थेट राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य केलं होत.

छगन भुजबळ यांनी नाशिकमधील वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, इतरांनी भाष्य करू नये असं म्हणत राऊतांना टोला लगावला होता. त्यावर संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांना त्रास होतोय म्हणून ते इकडे तिकडे फिरत असल्याचं मत व्यक्त केलं. ते पुण्यात पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या व्याख्यानानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत होते.

संजय राऊत यांना आघाडीत सुरू असलेले पेल्यातील वादळं आघाडीला अडचणीत आणत आहेत का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर संजय राऊत म्हणाले, “नाशिकमधील छगन भुजबळ आणि सुहास कांदे वाद मिटेल. आम्ही काही पेल्याबिल्यात पित नाही. आमच्याकडे वाद नाही. आमच्याकडे पेल्यातील वादळं येत नाहीत, जी येतात ती मोठी येतात आता राऊत यांच्या या टीकेला भुजबळ काय प्रतिउत्तर करतायत हे पाहावे लागणार आहे.

 

Back to top button