राजकीय

केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत राहिला तर.. पृथ्वीराज चव्हाण यांचा मोदी सरकारला टोला

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय तपस यंत्रणेकडून राज्यातील आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर, खासदार आणि आमदारांवर तपास यत्रंणेने चौकशीचा ससेमिरा मागे लावला होता. याच मुद्द्यावरून आघाडीच्या मंत्र्यांकडून विरोधकांवर घांगहीवाटी टीका करण्यात आली होती. आता त्या पाठोपाठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला आहे.

केंद्रीय तपास संस्थांचा वापर करुन धमकापलं जात आहे. अशा पद्धतीनं तपास संस्थांचा वापर गैर आहे. अशाप्रकारे तपास संस्थांचा वापर होत राहिला तर त्यांची विश्वासार्हता संपेल. या तपास यंत्रणांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही, अशी खोचक टीका चव्हाण यांनी केली आहे ते मुंबईत पत्रकार माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.

एनसीबी इथल्या काही प्रमाणातल्या ड्रग्सवर कारवाई करते. पण गुजरातमध्ये ३० हजार कोटी रुपयांचं ड्रग्स सापडलं त्याची कुणीच चर्चा करत नाही. लसीकरणाबाबतही फक्त प्रसिद्धी केली जात आहे. पण जगात दोन डोस घेतलेल्यांच्या यादीत देश १४४ व्या स्थानी आहे. भारतात फक्त 24 टक्के लोकांना डोस मिळाले आहेत. खोटी प्रसिद्धी देऊन अपयश लपवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही चव्हाण यांनी मोदी सरकारवर केली आहे.

Back to top button