बीड
वार्ड क्रमांक १२मध्ये काँग्रेस कडून जनतेच्या उमेदवार रिंगणात उतरणार सौ. वंदना गणेश जवकर यांचा समाजोपयोगी दृष्टिकोन जाहीर

वार्ड क्रमांक १२मध्ये काँग्रेस कडून जनतेच्या उमेदवार रिंगणात उतरणार
सौ. वंदना गणेश जवकर यांचा समाजोपयोगी दृष्टिकोन जाहीर
बीड (प्रतिनिधी) – शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधून सामाजिक कार्यकर्ते गणेश जवकर यांच्या सौभाग्यवती वंदना जवकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून या अनुषंगाने त्यांनी समाजोपयोगी दृष्टिकोन जाहीर केला आहे.
यात त्यांनी महिला बचतगटांना उत्पादन विक्रीसाठी ‘महिला बाजाराचे निर्माण करून याद्वारे शिवणकाम, ब्यूटी पार्लर, घरगुती उद्योग यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल. गल्लीच्या कोपऱ्यांवर आकर्षक “स्मार्ट बेंचेस” ठेवण्यात येईल. वार्डातील प्रत्येक चौकात मोफत Wi-Fi झोन निर्माण करण्यात येईल. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकासाठी हेल्पलाइन नंबर आणि तातडीची मदत व्यवस्था कार्यान्वित करण्यात येईल. प्रत्येक सार्वजनिक कामावर ‘किती खर्च, कोणते ठेकेदार, किती वेळात काम पूर्ण’ याच्या माहितीचे डिजिटल बोर्ड लावण्यात येईल. नागरिकांच्या तक्रारींसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात येईल. प्रत्येक ६ महिन्यांनी कामांचा आढावा आणि नागरिकांसोबत संवाद बैठक घेण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी “दिनसदन” व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. महिलांसाठी सुरक्षा ॲप, CCTV आणि हेल्पलाइन सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. गरजू कुटुंबांसाठी निवारा व शैक्षणिक सहाय्य योजना राबविण्यात येईल. प्रभागातील शासकीय शाळांमध्ये मूलभूत सोयी व डिजिटल शिक्षण साधनांची वाढ करण्याचे प्रयत्न करण्यात येईल. सुशिक्षित युवक व युवतींसाठी रोजगार मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात येईल. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मैदान व क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. प्रभागात हरित उद्यान आणि खुल्या व्यायामशाळांची निर्मिती करण्यात येईल. आरोग्य तपासणी शिबिरे आणि महिला आरोग्य उपक्रम नियमितपणे घेण्यात येईल. प्रभागातील प्रत्येक गल्ली व वसाहती मध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. ड्रेनेज आणि गटार यंत्रणा सुरू करण्यासाठी शासन-प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. सर्व रस्ते, नाली आणि फुटपाथांचे डांबरीकरण/ कॉंक्रिटीकरण व दुरुस्ती करण्यात येईल. आवश्यक ठिकाणी नाल्यांचे निर्माण करण्यात येईल. प्रभागात नियमित कचरा संकलन आणि स्वच्छतेसाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात येईल. प्रभागातील रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी पुरेशा प्रकाशाची व्यवस्था जागोजागी एलईडी दिवे लावून करण्यात येईल. प्रभागातील नागरिकांना दोन दिवसाला नळाचे पाणी मिळावे याकरिता पाली आणि माजलगावच्या जायकवाडी धरणाची पाईपलाईन कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
एकीकडे सौ. वंदना जवकर यांनी असा दृष्टिकोन मांडला आहे तर दुसरीकडे त्यांचे पती गणेश जवकर गेल्या २३ वर्षांपासून करत असलेल्या सामाजिक कार्याची पुण्याई सुद्धा त्यांच्या पाठीशी असल्याने त्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या या प्रभागातील दमदार उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत.

—