बीड

श्री कालिंका बलभिम गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी युवराज धोंडगे, उपाध्यक्षपदी अंकुश कुकडेजा, सचिवपदी अमित कदम

श्री कालिंका बलभिम गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी युवराज धोंडगे, उपाध्यक्षपदी अंकुश कुकडेजा, सचिवपदी अमित कदम

बीड (प्रतिनिधी):- बीड शहरातील नावाजलेले श्री कालिंका बलभिम गणेश मंडळाची बैठक ज्येष्ठ मार्गदर्शक शेखर जवकर, अंबादास नवले, वसंत कदम, दत्ता व्यवहारे, सचिन जवकर,अमोल काळे,अ‍ॅड.सुधिर जाधव, अजित कदम,धर्मेश कदम,प्रविण साळुंके,शितल राऊत, मनोज नवले, सुनील कोकाटे, चंदन दातवाणी, अमरापूरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली जवकर मंगल केंद्र बलभिम चौक येथे नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते श्री कालिंका बलभिम गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी युवराज धोंडगे, उपाध्यक्षपदी अंकुश कुकडेजा, सह उपाध्यक्ष विनय नवले, सचिवपदी अमित कदम, कोषाध्यक्षपदी गणेश कदम, सह काषाध्यक्षपदी अभिषेक नवले तर व्यवस्थापक पदी आकाश व्यवहारे यांची निवड करण्यात आली.
श्री कालिंका बलभिम गणेश मंडळाचे यंदाचे 59 वे वर्ष असून यंदा गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार जाणार आहेत. श्री कालिंका बलभिम गणेश मंडळाने यापूर्वी समाजात जनजागृतीसाठी बेटी बचाव..बेटी पढाव, झाडे लावा..झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जीरवा, एचआयव्ही जनजागृती, रक्तदानाचे महत्व, देशभरातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र असे विविध देखाव्याचे सादरीकरण केलेे आहे. या मंडळाने सलग 10 वर्षे देखाव्याचे प्रथम पारितोषीक पटकाविलेले आहे.
सन 2024 च्या गणेशोत्सव काळात उत्कृष्ट मिरवणूकीबद्दल जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालया मार्फत प्रथम पारितोषिक मिळाले असून यंदाच्या गणेशोत्सवात देखील उत्कृष्ट देखाव्याचे सादरीकरण व भव्य अशी मिरवणूक काढण्याचा संकल्प मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. श्री कालिंका बलभीम गणेश मंडळाच्या नुतन पदाधिकार्‍यांच्या निवडीबद्दल विशेष अभिनंदन बीड जिल्हा शिवसेना उपजिल्हा प्रमुख अजय जाधव, श्रीमंत गोतावळे, संन्मत्ती पोरवाल, संदीप जाधव, प्रा.विजय जाधव, संतोष कदम, कामेश जवकर, नाचरे सर, सार्थक कदम, स्वयंम नवले, यश जवकर, समर्थ नवले, तुपकर, आसाराम सोनवणे यांच्यासह सर्व गणेश भक्तांनी केले आहे.

Back to top button