बीड

भाजपाच्या प्रदेशाध्यक्षाकडून गेवराईचे  अॕड. सुरेशराव हात्ते यांचे अभिनंदन 

भाजपाच्या प्रदेशाध्यक्षाकडून गेवराईचे  अॕड. सुरेशराव हात्ते यांचे अभिनंदन
गेवराई,  दि.  प्रतिनिधी ;- भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्वामध्ये हजारो सदस्यांची नोंदणी करुन त्यांना भारत देशाच्या नवनिर्माणाच्या प्रवासात सहभागी करुन घेतल्याबद्दल  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गेवराईचे सामाजिक नेतृत्व अॕड. सुरेशराव हात्ते यांचे अभिनंदन केले आहे.
         गेवराई तालुक्यातील अनेक भागात अॕड. सुरेशराव हात्ते यांनी भारतीय जनता पार्टीच्या संघटन बांधणीचे काम जोमाने सुरु केले आहे. या पर्वामध्ये हजारो सदस्यांची नोंदणी करुन कार्य पुढे नेल्याचे कौतुक करुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढे म्हणटले आहे की, भाजपाचे अंत्योदय धोरण आपण जनमानसात घेऊन जात आहाेत. यातुन आपली लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि पक्ष विचाराप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते. आपल्या या समर्पित योगदानाबद्दल पक्षाध्यक्ष म्हणून आदर व अभिमान वाटतो.
       आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची जगभरात मान उंचावली आहे, आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र थांबणार नाही, याची सर्वांना खात्री आहे. संघटन पर्वात किमान एक हजार सदस्य सुरेशरावजी हात्ते यांनी भाजपा सोबत जोडून संघटना बळकट केली आहे, शिवाय महाराष्ट्राच्या विकासासाठीचे दूतही आपण जोडून घेतलेले आहेत. आपल्या या योगदानाबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिनंदन केले आहे.
Back to top button