बीड
लाईनस्टाफ संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंची घेतली भेट..

लाईनस्टाफ संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंची घेतली भेट..
महावितरण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाईनस्टाफवर अन्याय करू नये…
बीड प्रतिनिधी :-बीड महावितरण वरिष्ठ अधिकाऱ्यां कडून लाईनस्टाफ कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून, त्यांच्या अडचणी व मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्यांची हेळसांड केली जात आहे. अशी तक्रार क्रांतिकारी लाईनस्टाफ सेनेच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या कडे लेखी निवेदना द्वारे केली आहे.
महावितरण बीड विभागीय कार्यालय अंतर्गत महिला तंत्रज्ञ कर्मचारी सौ. अस्मिता प्रकाश रायमल व त्यांचे पती प्रकाश रायमल कार्यरत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची पती प्रकाश रायमल यांच्याशी चालू असलेल्या कुरबुरी मुळे पत्नी सौ. अस्मिता रायमल यांची अन्यकारक बदली केल्याने लाईनस्टाफ कर्मचाऱ्यांनी नाराज व्यक्त करून सदरील बदली रद्द करण्याची विनंती केली आहे. नैराश्याच्यातुन सदरील महिला कर्मचारी यांनी 11 जुलैच्या सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पती मुलांना सोडून निघून गेल्या आहेत. माझे काही बरे वाईट झाले तर यास सर्वस्वी जबाबदारी
बदली प्रस्ताव पाठवणाऱ्या अभियंत्याची असेल, असा मेसेज टाकला आहे. 11 जुलै रोजी रात्री ग्रामीण पोलीस स्टेशनला या प्रकरणाची माहिती दिली आहे.प्रकाराचे गांभीर्याने
चिंतीत होवून क्रांतिकारी लाईन स्टाफ सेनेचे पदाधिकारी व सभासद यांनी भेट घेतली शेख अमीर मदनी,गजानन साळुंके, अश्वलींग बरे, गोकुळ गायकवाड, रजनीकांत तागड, गणेश कागदे,प्रवीण शिंदे, दत्ता माटे,रवी देशमुख,युवराज जोगदंड,लहु वाघमारे,सुनिल लांडगे, रामदास गायके यांच्या नेतृत्वात लाईनस्टाफ कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
कार्यकारी अभियंता श्री डोंगरे यांच्याशी राजेंद्र मस्के यांनी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करावे. आकसा पोटी कोणावरही अन्याय करु नका. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसी चर्चा करून मार्ग काढावा अशी सूचना केली आहे.



