संभाजीराव बडे ‘समाजभूषण’पुरस्काराने सन्मानित*-बाळासाहेब कोठुळे (ज्येष्ठ साहित्यिक)

संभाजीराव बडे ‘समाजभूषण’पुरस्काराने सन्मानित*-बाळासाहेब कोठुळे (ज्येष्ठ साहित्यिक)
अहिल्या नगर-पाथर्डी तालुक्यातील हातराळ येथील सामाजिक कार्यकर्ते व स्वामी विवेकानंद युवा ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजीराव बडे यांना लोककला, कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने दिला जाणारा मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या शुभहस्ते व संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पवार, कविवर्य बाळासाहेब कोठुळे, व कवी राजेंद्र फंड यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये एका शानदार समारंभपूर्वक कार्यक्रमांमध्ये वडाळा (महादेव )तालुका श्रीरामपूर येथे प्रदान करण्यात आला. संभाजीराव बडे यांचे स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ते शैक्षणिक मदतीचा हात देतात. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांना त्यांनी सहकार्य केले आहे. निसर्ग संवर्धनासाठी झाडे लावा झाडे जगवा, जातीय सलोखा रॅली , प्लास्टिक निर्मूलन, व्यसनमुक्ती अभियान, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, लेक वाचवा लेक शिकवा, एड्स जनजागृती अभियान यासारख्या समाज उपयोगी अभियान राबवून युवकांपुढे एक नवा आदर्श निर्माण करून त्यांनी दिला आहे. समाजातील सर्व स्तरातील जनतेशी त्यांचा मोठा व प्रभावी जनसंपर्क असल्यामुळे अनेक समाज उपयोगी कार्यात ते अग्रेसर असतात. या सर्व कार्याची दखल घेत , लोककला कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने त्यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांचे हत्राळ गावचे सरपंच दादासाहेब शिवनकर, हुतात्मा बाबू गेनू संस्थेचे सचिव कुशल दादा भापसे, रेणुका माता मल्टीस्टेट चे श्री जगनाडे साहेब, खादी ग्रामोद्योगचे संचालक परमेश्वर टकले, सैदापूरचे सरपंच विष्णू केदार, उपसरपंच संभाजी राजे केदार, विश्वास केदार, रेवणनाथ केदार, एकनाथ केदार, संपत टकले, आसराजी टकले गुरुजी, पोपटराव केदार, सुभाष केदार , बबनराव केदार, पप्पू केदार, शहादेव केदार यांनी त्यांचे अभिनंदन केले.



