बीड

नगरपालिका मूग गिळून गप्प का?

नगरपालिका मूग गिळून गप्प का?
खरोखरच बीड शहरातील दुर्व्यस्था पाहुण शांत बसने म्हणजे पालिकेचे अपराध पोटात गिळून घेणे असल्या सारखे आहे. बिडची जनता पण इतकी शांत का बसते हेच कळतं नाही.
अन्न,पाणी आणि निवारा हि माणसाचे मूलभूत हक्क आहेत.पाणी वीस दिवसाने तर काही ठीकणे महिनो ना महिणे येत नाही. रस्ते खराब आहेत.
आपण खड्यात आहोत का बीड खड्यात आहे तेच कळतं नाही.ट्रॅफिक चा उलट त्रासच होतो.गैर ठिकाणी ड्युटी वर असतात.
किती आणि किती प्रकाराचा त्रास लोकांनी सहण करायचा.
रस्त्यावरती कचरा वरचे वर साठत जातो.मंत्री संत्री कोणी आलेतरच रस्ते स्वच्छ करता.
पालिका सरळ म्हणते माणसं नाहीत करायला मग आता रस्ता स्वच्छ करायला कशी मिळतात.मागील पगारे या लोकांची कुठे गेली.अनेक पगारे गिळकृत करून भरपेट खाल्ली.हा सर्व आलेला निधी जातो कोठे हे विचारायचा जाब लोकांना आहे.
सर्व बीड शहरात खड्डे पावसाच्या अगोदरच दुरुस्त करायला पाहिजे होते.पण परत तीच बोब नगरपालीका कडे यांचे पगार काय दयाचे.
रस्ते काय अन रस्त्या वराचा आणि गल्ली बोळा पासून ते मोठ्या कॉलनी पर्यत काय ठीक ठिकाणी  कच्याऱ्या चे ढिगारे वर्षानुवर्षे काय आहे त्याच ठिकाणी आहेत.
या घाणी मुळे अनेक रोग,आजार वाढतच चालली आहे.लहान मुले,महिला,वडिलधारी मंडळी हे सतत आजरी असतात.परंतू म्हणजे नगरपालिकेला करायच काय असेच दिसते. कित्येक वर्ष.
 नळ पट्टी वर्षा ची देऊन पण नळे सारी कोरडीच.शहरातील बऱ्याच रस्त्यावर दिवे लावलेली नाहीत.अंधारात कसे करायचे.
नगरपालिका मात्र पैसे गिळून मोठी झाली.हा शासकीय पैसा खाऊन मूग गिळून गप्पा का असा जाब विचारला पाहिजे.समोर येऊन निवेदने द्याची असतात.वेळ आलीच तर पालिका समोर उपोषणाला बसायचं असते.असे मागे मागे पालिकेवर राग mदाखवून,त्रास सहण नाही करायचा.
नगरपालिकेलाj निधी गेला कोठे विचारायचा पूर्ण अधिकार आहे आपण विचारायचा.
लोकांहो बोला,आपल्या मूलभूत गरजा आपल्याला हव्या आहेत.एकजुटीने एकत्र येऊन या शहराचा विकास करूयात
Back to top button