📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जि.प.प्राथ.शाळा (मराठी, मुले/मुली) येथे ‘डिजिटल स्कूल’ संकल्पने अंतर्गत ऑनलाईन लोकार्पण सोहळा संपन्न

जि.प.प्राथ.शाळा (मराठी, मुले/मुली) येथे ‘डिजिटल स्कूल’ संकल्पने अंतर्गत ऑनलाईन लोकार्पण सोहळा संपन्न

जामखेड प्रतिनिधी :- ‘डिजिटल स्कूल’ या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मराठी – मुले/मुली) येथे ऑनलाईन इंटर‌ एॅक्टिव्ह पॅनलच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याचे ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी श्री. विजय शेवाळे, केंद्र प्रमुख नवनाथ बडे, विश्वस्त मंडळाचे मुकुंदराज सातपुते, तसेच शाळा व्यवस्थापन समिती (मुले) चे अध्यक्ष नासीर सय्यद व शाळा व्यवस्थापन समिती (मुली) अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी राळेभात , उपाध्यक्ष निलेश गायकवाड यांची उपस्थिती लाभली होती.

शाळेचे मुख्याध्यापक (मुले) संजय कर्डिले व मुख्याध्यापक (मुली) दत्तात्रय यादव, तसेच विविध मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहून डिजिटल शिक्षणाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
या सोहळ्याला प्रा. संजय राऊत (भाजपा तालुका उपाध्यक्ष), नगरसेवक दिगांबर चव्हाण,अमित जाधव, संजय काशिद, पवन राळेभात (भाजपा शहराध्यक्ष),ॲड. महारुद्र नागरगोजे, धनराज पवार,विशाल बारवकर, शिरिष कदम, सागर माकुडे, अंबादास जोगदंड,शंकर साबळे, शैलजा बडे, निशा कदम, निर्मला सिद्धेश्वर, पवार मनिषा, मंजुषा कानडे, अर्चना भोसले, सोनाली झोरे, प्रतिभा ढोबळे, भारती क्षीरसागर, सुमन खेडकर,श्रीमती अल्का धाऊड, राधा डिसले, वंदना मोरे, कल्पना ससाणे, कल्पना साबळे, राणी वराडे,रेखा साळे,कल्पना मोरे ,श्रीमती कालिंदा म्हेत्रे, सारिका पोले,सरिता कवडे,नितीन मोहळकर
आदी शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या विशेष पुढाकाराने मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजिटल शिक्षण प्रणाली उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे.

Back to top button