बीड

परळीत अनुदानित बियाण्यासाठी मोंढा परिसरात संजय फर्टिलयझर्स या दुकानावर शेतकऱ्यांच्या रांगा !

परळीत अनुदानित बियाण्यासाठी मोंढा परिसरात संजय फर्टिलयझर्स या दुकानावर शेतकऱ्यांच्या रांगा !

 

उर्वरित कृषी बियाणे विक्रेत्यांनी बियाणे उपलब्ध नसल्याचे दिले कारण ; तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा निष्काळजीपणा !

 

परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभाग व दुकानदारांमुळे त्रास ; शेतकऱ्यांची नाराजी !

 

शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे तात्काळ द्या अन्यथा शेतकऱ्यांसह आंदोलन करणार – नामदेव गित्ते

 

परळी(प्रतिनिधी)राज्य शासनाच्या कृषी विभागाचे मार्फत खरीप हंगाम 2026 साठी अनुदानावर देण्यात येणाऱ्या बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते,त्यात प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या निकषानुसार तालुक्यातील अनेक शेतकरी पात्र ठरले आहे,त्यानुसार तालुका कृषी अधिकारी कार्यालया मार्फत बियाणे घेण्यासाठी अधिकृत परमिट देण्यात आले त्यात बहुतांशी शेतकऱ्यांना सोयाबीन या बियाण्याचे परमिट दिले,परंतु बियाणाचा कोणता वाण आहे त्याचा उल्लेख त्यात करण्यात आलेला नाही,तसेच अधिकृत बियाणे देण्यासाठी किसान,रुक्मिणी फर्टिलायझर्स व संजय फर्टिलायझर्स यांना प्राधिकृत केले आहे,त्यात किसान व रुक्मिणी फर्टिलायझर्स यांनी सोमवारी शेतकऱ्यांना बियाणे संपले असल्याचे कारण दिले त्यामुळे संजय फर्टिलायझर्स या एकाच कृषी परवानाधारक विक्रेत्याकडे बियाणे घेण्यासाठी मोठी गर्दी झाली असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत,त्यामुळे शेतकऱ्यांची परेशानी होत आहे,तालुक्यातील किती शेतकऱ्यांनी बियाणांसाठी अर्ज केले,किती शेतकरी पात्र ठरले आणि त्यांना किती बियाणे आवश्यक आहे याची संपूर्ण माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे आहे त्या आधारे बियाणांचे परमिट शेतकऱ्यांना दिलेले असताना त्यानुसार सर्व पात्र कृषी बियाणे विक्रेत्यांकडे सोयाबीनचे बियाणे उपलब्ध का नाही ? जर बियाणे उपलब्ध नसेल तर शेतकऱ्यांना बियाणांचे परमिट का दिले ? असा गोंधळ अनुदानित बियांणा बाबत होत असताना तालुका कृषी अधिकारी नागरगोजे मॅडम यांनी काहीही नियोजन केले नाही,त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे,त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या बियाणानुसार सर्व कृषी बियाणे दुकानदाराकडे समान परमिट देऊन त्वरित सर्व शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे उपलब्ध करून द्यावे अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा नंदागौळ येथील सेवा सहकारी  सोसायटीचे संचालक व शेतकरी नामदेव जीवन गित्ते यांनी दिला आहे.

 

Back to top button