संपादकीय

लोकेश राहुल, राशिद खान यांच्यावर IPL २०२२ खेळण्यास बंदी?

 

इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी मेगा ऑक्शनच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अहमदाबाद व लखनौ या दोन नव्या फ्रँचायझींमुळे Mega Auction होणार आहे आणि त्यासाठी सध्या संघात असलेल्या ८ फ्रँचायझींना प्रत्येकी चार खेळाडूंना कायम राखता येणार आहे.आज ८ फ्रँचायझींना दिलेली मुदत संपत आहे आणि रात्रीपर्यंत प्रत्येक संघानं त्यांच्या कोणत्या खेळाडूंना कायम राखले हे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, लोकेश राहुलव राशिद खान यांच्यावर बंदीच्या कारवाईची शक्यता वर्तवणारे वृत्त चर्चिला जात आहे. त्यात किती तथ्य आहे, हे जाणून घेऊयात…

सध्या असलेल्या ८ फ्रँचायझींना प्रत्येकी ४ खेळाडूंनाच संघात कायम राखता येणार आहे. फ्रँचायझींनी त्यांची यादी बीसीसीआयकडे सुपूर्द केल्यानंतर अहमदाबाद व लखनौ फ्रँचायझींना रिलिज केलेल्या खेळाडूंमधून प्रत्येकी ३ जणांना Mega Auction पूर्वी करारबद्ध करता येणार आहे. त्यासाठी त्यांना १ ते २५ डिसेंबर ही मुदत दिली आहे. पण, या मुदतीआधीच लखनौ फ्रँचायझीनं लोकेश राहुल व राशिद खान यांच्याशी बोलणी सुरू केली. त्यामुळे पंजाब किंग्स ( PBKS) व सनरायझर्स हैदराबादनं ( SRH) या फ्रँचायझीविरोधात बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ”आमच्याकडे लेखी तक्रार आलेली नाही, परंतु दोन फ्रँचाझींनी लखनौ संघाविरोधात तक्रार केली आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत आणि तसं काही घडलं असेल तर कारवाई केली जाईल,”असे बीसीसीआय अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाले,”आम्हाला संतुलन बिघडवायचे नाही. कट्टर स्पर्धा असताना तुम्ही अशा गोष्टी टाळू शकत नाहीत, परंतु सध्या खेळत असलेला संघ संघाचे संतुलन बनवण्याचा प्रयत्न करत असताना असे करणे चुकीचे आहे.”

Back to top button