संपादकीय

अपघातात जखमी झालेल्यांना मदतीसाठी केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड उतरले रस्त्यावर

 

औरंगाबाद | केंद्रीय अर्थ राज्यमंत्री असलेले डॉ. भागवत कराड यांचंही राजकारणापलिकडचं एक रुप लोकांना पाहायला मिळालं आहे. रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे कराड यांचं हे रुप समोर आलं आहे. त्यांच्या या कामाचे आता सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे. डॉ कराड सध्या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार डॉ भागवत कराड रविवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातून सुुभेदारी विश्रामगृहाकडे जात होते. त्या दरम्यान त्यांच्यासमोरच अचानक रस्त्यावर रिक्षा उलटली. डॉ.कराड लगेचच गाडीतून उतरून अपघात झालेल्या ठिकाणी गेले. त्या अपघातात दोन लहान मुलं जखमी झाले होते. यावेळी कराड डॉक्टरांच्या भूमिकेत पाहायला मिळाले.

यावेळी डॉ.कराड यांनी स्वत:चा हातरुमाल काढला आणि त्या रुमालाच्या साहाय्याने लहान मुलांच्या ओठातून येणारा रक्तस्त्राव रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी स्वत: मुलांना इतर कुठे लागलं आहे का हे? तपासले. ते मुलांना रुग्णालयात सुद्धा घेऊन चालले होते. मात्र त्याचवेळी मुलांचे नातेवाईक आल्याने त्यांनी मुलांना नातेवाईकांकडे सोपवले.

Back to top button