संपादकीय

काय सांगता | कतरिना-विकीच्या शाही विवाह सोहळ्याला येणार तब्बल ४० पंडीत

मुंबई | राजस्थानमधील सवाई माधोपूरमधील सिक्‍सस्थ सेन्स फोर्टमध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. या विवाह समारंभासाठी मुंबईमधून एक खास तंबू आला आहे. हा हॉटेलच्या आवारामध्ये हा तंबू लावला जाणार आहे. इव्हेंट कंपनीच्यावतीने मॅनेजमेंट कंपनीच्या निर्देशांवरून हा तंबू उभारला जाणार आहे.

सदर तंबू पूर्णपणे बंदिस्त असणार आहे. त्याला आतून काचेचे पडदे लावले जाणार आहेत. हा तंबू एखादा राजवाडा शोभावा अशी त्याची सजावट केली जाणार आहे. या तंबूमध्येच विकी आणि कतरिनाच्या विवाहाचे सर्व धार्मिक विधी होणार आहेत. हा विवाह सोहळा वैदिक पद्धतीने होणार आहे. सिक्‍स्थ सेन्स फोर्टशिवाय आणखीन 3 हॉटेलांचेही बुकिंग करण्यात आले आहे.

याशिवाय आणखीन एक वन्य महल हॉटेलचे बुकिंगही केले जाणार आहे. बॉडीगार्ड, बेबी सीटर, मेकअप आर्टिस्ट आदींची व्यवस्था या हॉटेलात केली जाणार आहे. याशिवाय विवाह समारंभासाठी 40 पंडीत येणार आहेत. त्यांच्याही रहाण्याची खास व्यवस्था केली जाणार आहे. 9 डिसेंबरच्या मुहूर्ताच्या आगोदर दोन दिवस आणि नंतर दोन दिवस आलिशान विवाह सोहळ्यासाठी शाही खानपान व्यवस्था केलेली असणार आहे.

Back to top button