बीड

मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता पाचेगावकर यांचा सेवापुर्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न

मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता पाचेगावकर यांचा सेवापुर्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न

जामखेड प्रतिनिधी;-श्रीमती सुनिता पाचेगावकर यांनी पूर्वी च्या समस्येवर प्राॅपर काम करुन शाळेतील गुणवत्ता वाढवली व समस्या सोडवण्यात यश मिळाले.१० महिन्याच्या कालावधीत १० वर्षांएवढे काम केले. असे प्रतिपादन सरपंच शरद जगताप यांनी केले.

जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोडेगाव येथील मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता दत्तात्रय पाचेगावकर यांचा दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता सेवापुर्ती व कृतज्ञता सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता दत्तात्रेय पाचेगावकर यांनी अखंड सेवा केली आहे. १७ ऑगस्ट १९९२ साली सेवेत रुजू झाल्या. घोडेगाव येथे १५ मार्च २०२४ असे एकूण दहा महिने पंधरा दिवस कालावधी असताना जिल्हा परिषद शाळेत साठी मिशन आपुलकी अंतर्गत ५ लक्ष लोकसहभागातून कामे केली.
यावेळी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वतीने सेवापूर्ती व कृतज्ञता सोहळ्या च्या निमित्ताने कृतज्ञता निधी मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता दत्तात्रय पाचेगावकर यांना ११,००० हजार रुपये चा चेक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना मंडळाचे विश्वस्त मुकुंदराज सातपुते म्हणाले की,श्रीमती सुनिता पाचेगावकर यांनी ज्या शाळेवर मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या तेथे त्यांनी प्रमाणिकपणे ज्ञानदान करण्याचे कार्य केले आहे.या कार्यक्रमाच्या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुरी केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश मोहिते हे होते तर प्रमुख पाहुणे मधुकर बोराटे,घोडेगाव चे सरपंच शरद जगताप, उपसरपंच शमशाद मुलाणी,अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक संतोष कुमार राऊत, विश्वस्त मंडळाचे मुकूंदराज सातपुते,अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक शाखा जामखेड शाखाधिकारी मुकुंद ढवळे,आदर्श शिक्षक एकनाथ चव्हाण, शिक्षक नेते अनिल अष्टेकर,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, शिक्षणप्रेमी महादेव भोंडवे,पांडुरंग मोहळकर,माजीद शेख,खंडेराव सोळंके, सुर्यकांत कदमआदी शिक्षक, शिक्षिका,विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष पाटील, अनिल यादव, संजय राऊत, रिंकू ढेंगळे, प्राजक्ता घायतडक आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय राऊत यांनी केले तर सूत्रसंचालन अनिल यादव व आभारप्रदर्शन संतोष पाटील यांनी मानले.

Back to top button