संपादकीय

नगरसेवक बिभिषण (मामा) धनवडे यांच्या माध्यमातून ४६ गाड्यांचा ताफा ; मोहटादेवी दर्शनासाठी रवाना

सलग २४ वर्षांची परंपरा ; आ. रोहित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

जामखेड प्रतिनिधी –
नगरसेवक बिभिषण (मामा) धनवडे व आधार फाऊंडेशन यांच्या माध्यमातून सलग २४ वर्षांपासून शहरातील महिलांना नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावर दर्शनासाठी नेले जाते. सालाबादप्रमाणे याहीवर्षी आमदार रोहित (दादा) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविला असून आज दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, युवक तालुकाध्यक्ष काकासाहेब राळेभात, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष उमर कुरेशी, रमेश आजबे, अमोल गिरमे, सुमित वराट, आसिफ शेख, गणेश हगवणे, त्रिंबक रोडे, बिलाल शेख आदी उपस्थित होते. यात्रेतील महिलांसाठी गडावर फराळीचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे.

यावेळी शहरातून तब्बल ४६ गाड्यांचा ताफा मोहटादेवी गडाच्या दिशेने रवाना झाले.आई राजा उदो उदो,अशा देवीच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. नगरसेवक बिभिषण (मामा) धनवडे यांनी सांगितले की, “गेल्या २४ वर्षांपासून आम्ही हा उपक्रम सातत्याने राबवत आहोत. महिलांना श्रद्धास्थान असलेल्या मोहटादेवीचे दर्शन घडविणे ही आमच्यासाठी आनंदाची आणि भक्तीभावाची बाब आहे.”

या यात्रेत सहभागी महिलांसाठी गडावर फराळीचे व विश्रांतीचेही योग्य नियोजन करण्यात आले असून, संपूर्ण यात्रा भक्तीमय आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडली.

नगरसेवक बिभिषण (मामा) धनवडे यांच्या या उपक्रमामुळे जामखेड शहरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या सहभागातून सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश देण्यात आला.

Back to top button