राजकीय

नवाब मलिक यांच्या आरोपनंतर समीर वानखडे यांच्या पत्नीचे सडेतोड प्रतिउत्तर

 

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखडे यांच्यावर गंभीर आरोप लगावून एकच खळबळ उडवून दिली होती. मलिक रोज नवीन नवीन खुलासा करून वानखडे यांच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आता मलिक यांच्या या टीकेला समीर वानखडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी सडेतो प्रतिउत्तर दिले आहे. असं निनावी पत्र कुणीही लिहू शकतं. पत्र लिहिणाऱ्याने समोर येऊन आरोप करावेत, असे आव्हानही क्रांती रेडकर म्हणाल्या.

या पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी प्रसिद्ध केलेल्या निनावी पत्राबाबत वानखडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर म्हणाल्या की, समीरवर करण्यात आलेले आरोप खोटे आहे. अशा प्रकारचं निनावी पत्र कुणीही पाठवू शकतो. ज्या पत्रावर कुणाचेही नाव नाही, कुणीही जबाबदारी घेत नाही, अशा पत्रावर आणखी काय बोलणार, आरोप करणाऱ्यांकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत, असे आव्हान क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांना दिले.

आज सकाळी नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याबाबत अत्यंत गंभीर आरोप लगावले होते. समीर वानखेडेंच्या कारवायांबाबत एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करता पाठवलेले पत्र प्रसिद्ध करत नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंनी केलेल्या २६ कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केला होता.

Back to top button