राजकीय

“आम्ही तुमच्या सोबत आहोत”; बॉलिवूड, मराठी इंडस्ट्रीतील लोक लपून मेसेज करतात – क्रांती रेडकर

 

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेले अनेक दिवस दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक यांनी समीर वानखडे यांच्यावर अनेक आरोप लॆले आहेत आता ता आरोपांना समीर वानखडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी प्रतिउत्तर दिले आहे. माझे पती फक्त देशसेवा करत आहेत, परंतु त्यांची प्रतीमा मलिन करणं हा आरोपांमागील उद्देश असल्याचं तिनं म्हटलं.

पुढे त्या म्हणाल्या की, “आम्ही तुमच्या सोबत आहोत, स्ट्राँग राहा असं बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोक लपून मेसेज करत आहेत. ते सर्वजण सोशल मीडियावर येण्यासाठी घाबरत आहेत. असं केलं तर आपल्याला यापुढे चित्रपटसृष्टीत काम मिळणार नाही, असं त्यांना वाटतंय. मगरीशी वैर का घ्यावं अशी भीती त्यांच्या मनात आहे असा त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलं होत मात्र पाठिंबा देणाऱ्याची नवे त्यांनी सांगितली नव्हती.

यावेळी वृत्तपत्रात जाहीर झालेल्या जन्मदाखल्यावर बोलतां त्या म्हणाल्या की,समीर वानखेडे यांच्या जन्माचा जो दाखला व्हायरल होत आहेतो बनावट असल्याचं म्हटलं. महाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांची वैयक्तीक माहिती जाहीर करत त्यांच्या वडिलांचं नाव दाऊद असल्याचा दावा केला. त्यांचा हा दावा खोटा असल्याचं सांगत आपल्या कुटुंबाना बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं वानखेडे यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

Back to top button