📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

राष्ट्रीय सेवा योजना समाजभान आणि सेवाभाव जागवणारा युवक घडवत आहे – डॉ. सोमीनाथ खाडे

राष्ट्रीय सेवा योजना समाजभान आणि सेवाभाव जागवणारा युवक घडवत आहे – डॉ. सोमीनाथ खाडे
बीड प्रतिनिधी  दि.07 जानेवारी 2026 रोजी श्री बंकटस्वामी महाविद्यालय, बीड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी शिबिराचा समारोप कार्यक्रम श्री क्षेत्र कपिलधार कपिलधारवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर धांडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सोमीनाथ खाडे (संचालक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.गोपाळराव सोंडगे  प्रशासकीय अधिकारी श्री बंकटस्वामी शिक्षण संस्था, खडकी घाट तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ब्रम्हनाथ मेंगडे (राष्ट्रीय सेवा योजना विभाग बीड जिल्हा समन्वयक) उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवक विद्यार्थिनी कु.अंकिता भालशंकर, कु.प्रेरणा कदम, कु.योगिता माने व कु.वैष्णवी ढेरे यांच्या सुमधुर स्वागत गीताने झाली. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना गीत व स्वागत समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.प्रतीक्षा शेळके यांनी केले.
या शिबिरादरम्यान शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी सात दिवसांचे अनुभव कथन करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये कु.श्रद्धा कुटे, कु.अश्विनी गायकवाड, कु.प्रतीक्षा शेळके, स्वयंसेवक विद्यार्थी सुजल कुचेकर, सुजल गायकवाड व अजय सोनगे यांनी मनोगत व्यक्त करून शिबिरातील सामाजिक, वैयक्तिक व शैक्षणिक अनुभव सांगितले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना मा.प्राचार्य डॉ.गोपाळराव सोंडगे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने उभे राहावे, तरुणांची ऊर्जा विधायक कार्यासाठी वापरली जावी, तसेच जीवनात ध्येय निश्चित करून वाटचाल करावी, असे प्रतिपादन केले. वाचन संस्कृती जपण्याचे महत्त्व अधोरेखित करत स्वतःच्या पायावर उभे राहे पर्यंत मोबाईलचा अतिरेकी वापर टाळावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
प्रमुख वक्ते डॉ.सोमीनाथ खाडे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत तरुणांमध्ये देशप्रेम, सामाजिक जाणीव व जबाबदारी निर्माण केली जाते, असे सांगितले. स्वच्छता, पाणी व अन्न बचत, शेतकऱ्यांच्या कष्टांचा सन्मान, वाचन संस्कृती जोपासणे या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला. निवासी शिबिरातून व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो आणि आज विद्यार्थ्यांनी निर्भयपणे मनोगत व्यक्त करणे हेच या शिबिराचे खरे यश असल्याचे त्यांनी नमूद केले. पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात महाविद्यालयाने केलेले योगदानही त्यांनी कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.शंकर धांडे यांनी विद्यार्थ्यांनी वाचन, व्यायाम, सकारात्मक ऊर्जा आणि समाजासाठी काहीतरी देण्याची भावना अंगी बाणवावी, असे मत व्यक्त केले. आपण ज्या ठिकाणी जातो तेथे परिवर्तन घडवून आणणे हेच राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट असून कपिलधार येथे विद्यार्थ्यांनी सकारात्मक संदेश दिल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक विद्यार्थिनी कु.कीर्ती भोसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे बीड जिल्हा समन्वयक डॉ.अरुण दैतकार यांनी केले. या सात दिवशीय शिबिराचे यशस्वी नियोजन कार्यक्रमाधिकारी डॉ. मनोजकुमार नवसे डॉ. सुनील त्रिभुवन, डॉ.शंकर शिवशेट्टे डॉ.प्रकाश कोंका डॉ जगन्नाथ चव्हाण, प्राध्यापिका सौ वर्षाताई भोसले, प्राध्यापिका  छाया सोंडगे, डॉ.नीता बावणे, प्रा. राजाभाऊ नागरगोजे, प्रा.रणजीत आखाडे, श्री मुकुंद भोसले यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक-प्राध्यापक, कपिलधारवाडी येथील ग्रामस्थ तसेच स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button