बीड

बिभीषण शेंडगे पाटील यांची सामाजिक बांधिलकी कौतूकास्पद : सीएस राऊत

 बिभीषण शेंडगे पाटील यांची सामाजिक बांधिलकी कौतूकास्पद : सीएस राऊत

सामाजिक उपक्रमांनी बिभीषण शंेडगे पाटील यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान शिबिरात 80 दात्यांचा सहभाग; बालकाश्रमात शालेय साहित्य वाटप

बीड (प्रतिनिधी):- बीड जिल्हा लॅब संघटनेचे सचिव बिभीषण शेंडगे पाटील यांचा ंवाढदिवस लॅब संघटनेच्या वतीने बीडमध्ये सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 80 जणंानी रक्तदान केले तर बालकाश्रमात शालेय सािहत्य वाटप व भोजन देण्यात आले. रक्तदान शिबिरास मिळालेला प्रतिसाद हा उल्लेखनिय आहे. रक्तदान शिबिरातून बिभिषण  पाटील यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी कौतूकास्पद आहे असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय राऊत यांनी केले.

जिल्ह्यातील विविध सामाजिक उपक्रमांत जिल्हा लॅब संघटनेचे सचिव बिभीषण शेंडगे पाटील यांचा नेहमीच सहभाग असतो.  शेंडगे यांच्या वाढदिवसानिमित्त संजिवनी हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शिबिरात 80 दात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नांेदविला. यावेळी डॉ.विवेक पालवणकर म्हणाले की, दरवर्षी असे उपक्रम आयोजित करावे. बिभीषण शेंडगे हे दरवर्षी वाढदिवसानिमित्त अवास्तव खर्च न करता रक्तदान व अन्नदानासारखे उपक्रम राबवून सामाजिक बांधिली जपतात. असे उपक्रम इतरांनीही घ्यावेत असे आवाहन  डॉ.पालवणकर यांनी केले. कार्यक्रमास डॉ.संकेत बाहेती, डॉ.विवेक दुसाणे, डॉ.सुधीर जाधव, डॉ.जयश्री बांगर, डॉ.शीतल पानसंबळ,डॉ.ऋषीकेश पानसंबळ, डॉ.निखिल जोशी, डॉ. बाळासाहेब शेंडगे, डॉ.विशाल कोटेचा, डॉ.संदीप सालपे, डॉ.सारीका बाहेती, डॉ.पाखरे आदी उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त शहरातील जिव्हाळा बेघर निवारागृह येथे धान्याची कोठी भेट देण्यात आली तसेच वृक्षारोपण करुन स्नेहभोजन देण्यात आले. पसायदान सेवा प्रकल्प येथे 9 वी व 10 वीच्या मुलांना पुस्तकसंच भेट व स्नेहभोजन, इन्फंण्ट इंडिया आनंदग्राम येथे मुलांचे औषधी ठेवण्यासाठी फ्रीज भेट  व स्नेहभोजन, मदर तेरेसा बालकाश्रम येथे मुलांना कपडे ठेवण्यासाठी पेटी भेट देऊन  वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप व स्नेहभाेजन देण्यात आले. कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोक ठाकरे, ज्येष्ठ नेते बबनराव गवते, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष धनंजय शेंडगे पाटील, संभाजी बिग्रेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वायकर यांच्यासह मुकुंद गोरे, इन्फंडचे दत्ता बारगजे, मेघराज कोल्हे, गणेश वरेकर, हरी गोरे, शुभम मुंजाळ, अशोक तांबारे, नागेश तांबारे, सरपंच दिनेश साबळे, बाळू ढेरे, सरपंच नवनाथ गवते, विठ्ठलकाळे, अमोल आबुज, जिल्हा लॅब असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

 
Back to top button