📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आळंदीतील नागरिकांचा संताप: लाईट बिल वाटप आणि रीडिंगमधील गोंधळामुळे त्रास शिवसेनेकडून महावितरणला निवेदन:- राहुल चव्हाण शिवसेना शहरप्रमुख आळंदी

आळंदीतील नागरिकांचा संताप: लाईट बिल वाटप आणि रीडिंगमधील गोंधळामुळे त्रास शिवसेनेकडून महावितरणला निवेदन:- राहुल चव्हाण शिवसेना शहरप्रमुख आळंदी

पुणे प्रतिनिधी :- दि. २६ जून: आळंदी शहरातील सामान्य नागरिकांना महावितरणच्या अनियमित लाईट बिल वाटप आणि रीडिंगमधील गैरप्रकारांमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी महावितरण कार्यालय, चाकण यांना तीव्र शब्दांत निवेदन सादर केले आहे. या निवेदनात लाईट बिल वाटपातील अनियमितता, चुकीच्या रीडिंगमुळे येणारी अंदाजे बिले आणि त्यामुळे नागरिकांना होणारा आर्थिक व मानसिक त्रास याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. यावेळी शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण, शाखा प्रमुख रोहिदास कदम, विनायक महामुनी, विशाल पंडीत तापकीर, उपस्थित होते.*

निवेदनात नमूद केल्यानुसार, आळंदी परिसरात लाईट बिल वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांना बिल भरण्यास अडचणी येत आहेत. शिवाय, रीडिंग घेण्याचे काम वेळेवर न झाल्याने अंदाजे आणि अनेकदा जास्त रकमेची बिले पाठवली जातात, ज्यामुळे नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. चुकीच्या बिलांच्या तक्रारी सोडवण्यासाठी नागरिकांना महावितरण कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत असून, यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे.

या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. यामध्ये लाईट बिल वाटपाची प्रक्रिया नियमित करणे, रीडिंग घेण्याचे काम पारदर्शक आणि वेळेवर करणे आणि चुकीच्या बिलांच्या तक्रारींसाठी विशेष कक्ष स्थापन करणे यासारख्या सूचना समाविष्ट आहेत.

राहुल चव्हाण यांनी महावितरणला उद्देशून म्हटले आहे की, “आळंदीतील सामान्य नागरिक या समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात येऊन अनेकांनी तक्रारी मांडल्या आहेत. महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात.” नागरिकांमध्येही या समस्यांबाबत तीव्र नाराजी आहे. महावितरण कार्यालय या निवेदनावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button