दलित,महिलांवरील हल्ले अन्यायकारक – प्रा.विकी घायतडक नान्नज घटनेचा आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध; पोलीस स्टेशन येथे निवेदन

दलित,महिलांवरील हल्ले अन्यायकारक – प्रा.विकी घायतडक
नान्नज घटनेचा आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध; पोलीस स्टेशन येथे निवेदन
जामखेड प्रतिनिधी – दलित व महिलांवरील हल्ले अन्यायकारक असून समाजाच्या मूलभूत मूल्यांना तडा देणारे आहेत. अशा घटनांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा सामाजिक सलोखा धोक्यात येईल,असे स्पष्ट मत प्रा. विकी घायतडक यांनी व्यक्त केले.
जामखेड तालुक्यातील नान्नज येथे झालेल्या घटनेमध्ये माहिलांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये जे आरोपी आहेत.आरोपी मोकाट फिरत त्यांना लवकर अटक करून कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी जामखेड येथे आंबेडकरी चळवळीतील नागरिकांनी पोलीस स्टेशन येथे निषेध व्यक्त करत निवेदन दिले आहे.यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना प्राचार्य घायतडक यांनी सांगितले की, समानतेच्या समाजासाठी अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे. न्याय मिळवण्यासाठी पीडितांसोबत प्रत्येकाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अशोक आव्हाड म्हणाले की, साळवे परिवारावरील भ्याड हल्ल्या म्हणजे एका कुटुंबावर नसून समस्त समाजावर आहे. असे हल्ले होऊ नये.यासाठी प्रशासनाने लक्ष देत आरोपींना कठोरात कठोर कारवाई करावी.
सुरेखाताई सदाफुले म्हणाल्या की,साळवे परिवारावरील भ्याड हल्ल्या हा निंदणीय आहे.असेच हल्ले यापुढे घडले तर दलित समाज शांत बसणार नाही.
कुसुम साळवे यावेळी बोलताना म्हणाल्या की, लहान मुलांना व महिलांना मारण्याचे आरोपींनी लायसन्स काढले आहे का? असा संतप्त सवाल केला.
निवेदनात म्हटले आहे की,रविवार दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी नान्नज येथे झालेल्या भ्याड हल्ल्या संदर्भात, जामखेड तालुक्यातील आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध व आरोपींना कठोरात कठोर करण्या संदर्भात समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे.यामध्ये महिलांवर झालेल्या मोठ्या प्रमाणावर हल्ला झालेला आहे.त्या ठिकाणी आरोपींनी तलवार, कोयते,दांडके या हत्याराने हल्ला करून दहशत माजवली. हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधार कोण आहेत. त्यांना समोर आणून लवकरात लवकर अटक करण्यात यावी .सदरील आरोपी हे संघटीत गुन्हेगार आहेत.त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्या संदर्भात त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी .सदरील घटनेचा तपास वरिष्ठ अधिकारी मार्फत करण्यात यावा.अशी समाजाची प्रमुख मागणी आहे.सदर आरोपी वरती कठोर कारवाई न झाल्यास समाजाच्या वतीने जामखेड बंद व रस्ता रोको करण्यात येईल.प्रशासनाने नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी निवेदनावर प्राचार्य विकी घायतडक, जेष्ठ नेते प्रकाश सदाफुले, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अशोक आव्हाड, सुरेखाताई सदाफुले,दिपक सदाफुले, संतोष गव्हाळे,अमोल सदाफुले,विशाल अब्दुले, वसंत गव्हाळे,कबीर घायतडक,स्वप्नील सदाफुले,माजी सरपंच शिवाजी ससाणे,रासपाचे विकास मासाळ , युवराज डाडर,किशोर समुद्र,प्रितम घायतडक, योगेश बनसोडे, स्वप्निल उबाळे,शुभम सदाफुले,वैभव गायकवाड, महादेव आव्हाड, सागर लोखंडे, बाळासाहेब आव्हाड आदींच्या सह्या आहेत.



