बीड

मुख्तार सय्यद यांच्या निवासस्थानी शिरखुर्मा पार्टी – रमजान ईदनिमित्त सर्वधर्मीय एकत्र

मुख्तार सय्यद यांच्या निवासस्थानी शिरखुर्मा पार्टी – रमजान ईदनिमित्त सर्वधर्मीय एकत्र

जामखेड प्रतिनिधी:-धार्मिक सणांच्या निमित्ताने समाजातील ऐक्य आणि बंधुत्व वृद्धिंगत करण्याचे मुख्तार सय्यद हे काम करत आहेत. असे मत जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे व्यक्त केले.

रमजान ईद निमित्ताने जामखेड शहरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व व्हाईलेट प्रेमी मुख्तार सय्यद ( जनता टेलर्स ) यांच्या निवासस्थानी शिरखुर्मा पार्टी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी
सर्वधर्मीय बांधव उपस्थित होते.

यावेळी जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड.डॉ. अरुण जाधव, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे, मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहर भाई काझी,नगरसेवक अमित चिंतामणी, आर्ट ऑफ लिव्हिंग शिक्षक जितेंद्र बोरा,हभप राजेंद्र महाराज म्हेत्रे,आबेद खान, इस्माईल सय्यद,इम्रान कुरेशी, नगरसेवक अर्शद शेख,उद्योजक अमित गंभीर,कय्युम बागवान,जमीर शेख,राजु कुलथे, सय्यद जाफर,अबरार सय्यद,आफताब सय्यद, धनराज पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात म्हणाले की,धार्मिक सणांच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि सौहार्द वाढविण्यासाठी उत्तरदायित्वाच्या दृष्टिकोनातून अशा कार्यक्रमांचे आयोजन सय्यद यांनी केले कौतुकास्पद.
या शिरखुर्मा पार्टीच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सामाजिक ऐक्य, सौहार्द आणि बंधुत्वाचा संदेश दिला, ज्यामुळे समाजातील विविध घटकांमधील संवाद आणि समन्वय वाढण्यास मदत होईल.

Back to top button