जामखेड मध्ये अत्याधुनिक उपचार सुविधा असलेले ‘लाईफ लाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ कार्यरत

जामखेड मध्ये अत्याधुनिक उपचार सुविधा असलेले ‘लाईफ लाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ कार्यरत
फक्त ₹५०० मध्ये १ लाखाचे आरोग्य संरक्षण – लाईफ लाईन हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम
जामखेड (प्रतिनिधी) – श्री दत्त बहुउद्देशीय संस्था संचलित ‘लाईफ लाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ जामखेड शहरात महाराष्ट्र बँक रोड, जुने हांगे हॉस्पिटल, बस स्टँडजवळ कार्यरत झाले असून, येथे आधुनिक तंत्रज्ञानासह विविध आजारांवर अत्यल्प दरात उपचार उपलब्ध आहेत.
या हॉस्पिटलमध्ये पुण्यातील प्रसिद्ध हाडांचे तज्ञ डॉ. अजय क्षीरसागर यांच्या सेवांचा समावेश असून, लहान मुलांचे वाकडे हात व पाय यावर विशेष उपचार दिले जातात. तसेच, पंचकर्म तज्ञ डॉ. सोमनाथ रासकर यांची सेवा देखील रुग्णांसाठी २४ तास उपलब्ध आहे.
हॉस्पिटलमध्ये सामान्य प्रसूती, सिझेरियन, पिशवीचे ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याध, त्वचाविकार, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, मुतखडा व किडनी विकार यावर उपचार केले जातात. हृदयविकार, फिट्स व अर्धांगवायू यांसाठी देखील खास उपचाराची सोय उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, येथे दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपी) शस्त्रक्रिया करण्याची सुविधा आहे.
संस्थेच्या आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांना अत्यल्प दरात सेवा मिळतात. याशिवाय, हॉस्पिटलने स्वतःची ५०० रुपयांची विमा संरक्षण योजना सुरू केली असून,या योजनेमध्ये ६ वेळा मोफत ओपीडी, ६ वेळा शुगर तपासणी आणि हॉस्पिटलच्या बिलावर १० ते ३० टक्क्यांपर्यंत सवलत. त्याअंतर्गत १ लाख रुपयांची विमा पॉलिसी उपलब्ध आहे.
*५०० रुपयांचे विमा संरक्षण योजना – वैशिष्ट्ये*
नोंदणी शुल्क: फक्त ₹५००
विमा रक्कम: ₹१,००,००० पर्यंतचे आरोग्य संरक्षण
*मोफत सेवा:*
६ वेळा ओपीडी (बाह्यरुग्ण सेवा)
६ वेळा शुगर तपासणी
*बिलावर सवलत:*
हॉस्पिटलच्या बिलामध्ये १०% ते ३०% पर्यंत सवलती
उपलब्धता: लाईफ लाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी विशेष सुविधा
*अधिक माहितीकरिता संपर्क:* ०२४२१-२२३३११
*चौकट*
या विविध योजनांमुळे ग्रामीण व गरजू रुग्णांना अत्यंत माफक दरात दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असून, हे हॉस्पिटल जणू गोरगरीब जनतेसाठी धर्मदाय रुग्णालयच होणार आहे.



