मुंबई

शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या टीकेला मनसे नेते सतीश नारकर यांचे सडेतोड प्रतिउत्तर

 

मुंबई | आयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेण्यासाठी आल्या होत्या. या भेटींदरम्यान माँ कांचनगिरी यांनी राज ठाकरे यांच्या शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते असे विधान केले होते याविधानावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आता या टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष (महाराष्ट्र राज्य)  सतीश नारकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

राज ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेसंदर्भात बोलताना त्यांनी खा. विनायक राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली होती. या संदर्भात बोलताना नारकर म्हणाले की, ज्यांनी आयुष्यात फक्त स्वताच्या स्वार्थाचाच विचार केला आहे त्याचं म्हणणं असाच असणार, म्हणतात ना की कावीळ झालेल्या माणसाला सगळे पिवळ दिसत तसच आहे हे ! अशी टीका त्यांनी केली होती.

पुढे ते म्हणतात की, ज्यांनी आयुष्यात फक्त स्वताच्या स्वार्थाचाच विचार केला आहे त्याचं म्हणणं असाच असणार, म्हणतात ना की कावीळ झालेल्या माणसाला सगळे पिवळ दिसत तसच आहे हे, खंबाटा एवीएशन बंद केले स्वताच्या स्वार्थासाठी, सांताक्रुझ मधील मिटर चोरले स्वताच्या स्वार्थासाठी, राजापूर मधील रिफायनरी पेट्रोलियम प्रोजेक्ट ला विरोध केला स्वतः च्या स्वार्थासाठी, स्वतः च्या स्वार्थासाठी आयुष्य भर केलेल्या मेहनती नंतर इतरांना आपल्या सारखं समजत असणारं ह्यात काही चुकीचे नाही अशी टीका नारकर यांनी केली आहे.

Back to top button