बीड

श्री बंकटस्वामी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

श्री बंकटस्वामी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
बीड प्रतिनिधी  दिनांक 21 जून 2026 रोजी येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग व महाविद्यालयातील क्रीडा विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर धांडे तसेच उपप्राचार्य डॉ.शंकर शिवशेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य व योग मार्गदर्शक प्रा.ब्रह्मनाथ मेंगडे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना समजावून सांगितले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी दिवसातून किमान एक तास योगासाठी देणे अत्यंत आवश्यक आहे.
तसेच त्यांनी योगाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, भारतीय ज्ञानपरंपरेतून निर्माण झालेला योग आज जगभरात स्वीकारला गेला असून, तो शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी एक शास्त्रशुद्ध व प्रभावी पद्धत म्हणून मान्यता पावला आहे.
या कार्यक्रमादरम्यान प्रा. मेंगडे यांनी उपस्थितांना विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक दाखवून योग्य प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button