बीड

जामखेडच्या विकासासाठी बाबुशेठ टायरवाले प्रयत्नशील – सोलार हायमॅक्स लोकार्पण उत्साहात

जामखेडच्या विकासासाठी बाबुशेठ टायरवाले प्रयत्नशील – सोलार हायमॅक्स लोकार्पण उत्साहात

शिवसेना शहरप्रमुख देविदास भादलकर यांच्या प्रयत्नांना यश –

प्रभाग २०, २१ मध्ये सोलार हायमॅक्स चा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

जामखेड प्रतिनिधी –अहिल्यानगरचे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांच्या सहकार्याने व शिवसेना जामखेड शहरप्रमुख देविदास भादलकर यांच्या विशेष प्रयत्नाने प्रभाग क्रमांक २० व २१ (सध्या चे प्रभाग १२)

साठी सुमारे ५१ लाख रुपयांचा सोलार हायमॅक्स प्रकल्प पूर्ण झाला आहे. या पुढे तालुक्यातील नागरी सुविधांसाठी अधिक विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनी दिले.

जामखेड नगरपरिषद प्रभाग २० व २१ (सध्या चे प्रभाग १२) येथे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभाग, अहिल्यानगर २०२४-२५ अंतर्गत सोलार हायमॅक्स लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना टायरवाले म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे वाढीव निधीसाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत.

या लोकार्पण प्रसंगी जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, शहरप्रमुख देविदास भादलकर, जिल्हा उपप्रमुख संतोष वाळुंजकर, मुस्तफा शेख, तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे, सुधीर निमोणकर, अरुण तांबे, अमोल खेत्रे, बिजू गौड, धीरज निमोणकर, नितीन घायतडक, केतन घायतडक, वैभव हजारे, बाबासाहेब घायतडक, रमेश गायकवाड, कदिर आत्तार यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*चौकट*

“शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जामखेड शहरासाठी तब्बल एक कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी दिला आहे. आमचा एकही नगरसेवक नसताना साहेबांनी इतका मोठा निधी दिल्याने जामखेडमध्ये शिवसेनेचे चांगले वातावरण निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकीत अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांच्या विशेष प्रयत्नाने व पक्ष सचिव संजय मोरे यांच्या सहकार्याने आणखी निधी आणण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

*– देविदास भादलकर,*
शहरप्रमुख, शिवसेना जामखेड

Back to top button