📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

शिवरायांच्या विचारांचे आचरण करून घडवा वैभवशाली भारत – ह.भ.प. गोविंद महाराज जाटदेवळेकर

शिवरायांच्या विचारांचे आचरण करून घडवा वैभवशाली भारत – ह.भ.प. गोविंद महाराज जाटदेवळेकर

ल. ना. होशिंग विद्यालयात ‘छत्रपती शिवरायांचे विचार’ विषयावर व्याख्यान

जामखेड प्रतिनिधी–शिवरायांच्या विचारांचे आचरण करून वैभवशाली राष्ट्र निर्माण करावे,असे प्रतिपादन ह. भ. प. गोविंद (महाराज) जाटदेवळेकर यांनी केले.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवरायांचे विचार या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाराज म्हणाले की, बलशाली भारत घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिवचरित्रातील शिकवण अंगीकारणे गरजेचे आहे. राष्ट्रप्रेमी मावळे होऊन आई, वडील व गुरुजनांच्या आज्ञेचे पालन करावे. प्रामाणिक अभ्यासासोबतच जिद्द, चिकाटी व साहसाच्या जोरावर संकटांवर मात करावी.

यावेळी महाराजांनी शिवचरित्रातील अनेक प्रसंगांचे प्रभावी कथन करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित शौर्यगीतांचे वीररसात गायन केले. तसेच राजमाता जिजाऊ, संत तुकाराम महाराज व संत रामदास महाराज यांच्या शिकवणीचे महत्व पटवून दिले.

कार्यक्रमात वाद्यवृंदासह गायनात ह. भ. प. अमोल महाराज आळंदीकर, ह. भ. प. विश्वा महाराज व तबलावादक ह. भ. प. हरीष नकाते यांनी सहकार्य केले.

प्राचार्य बाळासाहेब पारखे व उपप्राचार्य युवराज भोसले यांनी ह. भ. प. गोविंद (महाराज) जाटदेवळेकर यांचे स्वागत करून आभार मानले.

या प्रसंगी प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपप्राचार्य प्रा. युवराज भोसले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, पर्यवेक्षक व एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे, जेष्ठ लिपिक ईश्वर कोळी, शिक्षक प्रतिनिधी पांडुरंग वराट, मुकुंद राऊत,माध्यमिक शिक्षिका प्रतिनिधी सौ. सुप्रिया घायतडक, समारंभ प्रमुख नरेंद्र डहाळे, किशोर कुलकर्णी आदी शिक्षक-प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Back to top button