📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

निसर्गाचे संरक्षण म्हणजे भविष्याचे संवर्धन ः- श्री. मधुकर वाघ

निसर्गाचे संरक्षण म्हणजे भविष्याचे संवर्धन ः- श्री. मधुकर वाघ
बीड (प्रतिनिधी)ः सौ.के.एस.के. महाविद्यालयातील पर्यावरण समितीच्या वतीने आयोजित जल आणि पर्यावरण आणि संवर्धन शाश्वतः विकासाचा मुलमंत्र या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री मधुकर वाघ सेवानिवृत्त अभियंता नगर परीषद बीड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जल आहे तर जिवन आहे आणि पर्यावरण तर भविष्य आहे. या संदेशातून पाण्याच्या एक एक थेंबाचे महत्व स्पष्ट केले. पावसाच्या पाण्याचे पुर्नभरण कसे करावे त्याचे दिर्घकालीन फायदे तसेच पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने घ्यावयाचे जबाबदार्‍या  या विषयी पॉवर पॉइंटच्या माध्यमातून सादरीकरण करत पर्यावरण विषयक सविस्तर मांडणी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळणकर हे होते. त्यांनी मानवी जिवनात पाण्याचे आणि पर्यावरणाचे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित केली. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक पर्यावरण समितीचे प्रमुख तथा संचालक प्रो. डॉ. प्रशांत पाटील यांनी केले. तर सुत्रसंचलन व आभार प्रो. डॉ. पी.आर. वाणी यांनी केले. यावेळी व्यासपीठावर कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे व राजेश साळुंके उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. ज्योती क्षीरसागर, प्रा. सोनाली गवारे , प्रा. शाम कुरे, प्रा. शितल हिरवे, प्रा. प्रियंका नवले, प्रा. ज्ञानेश्वर घोडके यांच्यासह सर्वांनी परीश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित  होते.
Back to top button