बीड

आज शिवजयंती उत्सव २०२६ निमित्त शांतता कमिटी बैठकीचे आयोजन-पो.नि.स्वप्निल उनवणे 

आज शिवजयंती उत्सव २०२६ निमित्त शांतता कमिटी बैठकीचे आयोजन-पो.नि.स्वप्निल उनवणे
केज/प्रतिनिधी:केज पोलीस ठाणे येथे आज बुधवार रोजी शिवजयंती उत्सव २०२६ निमित्त शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी,कार्यकर्ते, शिवप्रेमी,पत्रकार बांधव यांनी उपस्थित रहावे असे आवाहन केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी केले आहे. बुधवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी ठीक १२-०० वाजता केज पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव २०२६ च्या अनुषंगाने शांतता कमिटी सदस्य, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार बांधव आणि सर्व विभागाचे शासकीय अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या शांतता कमिटीच्या बैठकीस केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष,सचिव, पदाधिकारी,कार्यकर्ते, शिवप्रेमी, पत्रकार बांधव यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी केले आहे.
Back to top button