संपादकीय

भगवान महावीरांची अंतिमवाणी आजही मानवतेला दिशा देणारी — प.पू.चारुप्रज्ञाजी म.सा.

जामखेड शहरात भगवान महावीरांच्या अंतिमवाणी ग्रंथाची भव्य मिरवणूक;आगम यात्रा

जामखेड प्रतिनिधी

पावापुरी नगरीमध्ये हस्तिपाल राजाच्या विनंतीला मान देऊन भगवान महावीरांनी २६०० वर्षांपूर्वी आपला अंतिम चातुर्मास पावापुरी नगरीमध्ये निश्चित केला होता, ४८ तासापर्यंत निरंतर उपदेश त्यांनी समोरचनामध्ये ठेवला. आणि हस्तपाल राजा,१८ देशाचे राजा- राणी, देवी- देवता इंद्र- इंद्रायणी, लक्ष्मी,सरस्वती,शासन माता पावापुरी नगरीमध्ये या दिवशी येऊन ४८ तासापर्यंत उपदेश दिला त्यावेळी समोरचनाची रचना होते.तसेच त्यांच्या अंतिमवाणीला खूप महत्त्व आहे.भगवान महावीरांनी दिलेला ४८ तासांचा उपदेश आजही मानवतेला दिशा देणारी असून अंतिमवाणीचे पालन म्हणजे जीवनात सत्य, अहिंसा आणि संयमाची साधना आहे.अंतिमवाणी हे केवळ ग्रंथ नव्हे, तर मोक्षमार्गाचा आरसा आहे .असे यावेळी कार्यक्रमा प्रसंगी परमपूज्य चारुप्रज्ञाजी म.सा. यांनी सांगितले.
दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता जैन श्रावक संघ, आयोजित जामखेड जैन स्थानक येथे सुरू असलेल्या चातुर्मास निमित्त परमपूज्य चारुप्रज्ञाजी म.सा.आदी ठाणा ६ यांच्या मार्गदर्शनाने भव्य- दिव्य ऐतिहासिक मिरवणूक जामखेड शहरातून पार पडली. यावेळी पालखीतून ग्रंथाची जैन बांधवांच्या वतीने पूजा करण्यात आली.
या मिरवणुकीत सुमारे ७० लहान मुले – मुली यांनी साधू संतांच्या वेशभूषा केली होत्या. तसेच शहरातील व्यापाऱ्यांनी १८ देशाचे राजा- राणी यांची वेशभूषा परिधान केली होती.
जामखेड शहरात ऐतिहासिक नोंद होईल अशी अलौकिक भव्य- दिव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात जामखेड शहरातील प्रसिद्ध भांड्याचे व्यापारी श्री.जितेंद्र बोरा यांच्या निवासस्थानापासून‌ (महावीर भवन) ,खर्डा चौक,बीड रोड, जय हिंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज पेठ येथून काढण्यात आली.जैन समाजातील पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी देवी-देवतांची,साधु संत,शेठ – शेठाणींचे वेश परिधान केला होता.
‌. मिरवणुकी वेळी रथामध्ये पावापुरी देशाचे हस्तीपाल राजाचा मान प्रसिद्ध भांड्याचे व्यापारी श्री.जितेंद्र बोरा व त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभा बोरा यांना राणीचा बहुमान मिळाला तसेच बोरा परिवारातील श्री.सारंग बोरा,सौ.प्रतिक्षा बोरा,श्री.भूषण बोरा,सौ.जागृती बोरा व कु.पूजा बोरा व श्रीमती रेखा बोरा आदींनी सहभाग घेतला. या ग्रंथ धार्मिक शास्त्र यात्रेत इंद्र – इंद्रायणी, माता लक्ष्मी, सरस्वती देवी व शासन माता यांचाही मान
यांना मिळाला.तसेच समस्त जैन समाजातील शेठ आणि शेठाणीचा मान मिळाला. या आगम यात्रेत मोठ्या संख्येने समस्त जैन समाजातील श्रावक,श्राविका सहभागी झाले होते.

जैन स्थानकामध्ये परमपूज्य जयाप्रज्ञाजी म.सा. यांच्या व्याख्यानाने तसेच महामांगलिकने आगम यात्रेची सांगता झाली. यावेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, संचालक व श्रावक ,श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरतीताई शिंगवी यांनी केले तर आभार प्रदर्शन जैन श्रावक संघाचे सेक्रेटरी शरद शिंगवी यांनी मानले.

Back to top button