बीड

आ. संदीप क्षीरसागर यांच्या गोटात मोठी फूट!

आ. संदीप क्षीरसागर यांच्या गोटात मोठी फूट!
*अनिलदादा जगताप यांच्या माध्यमातून सतीश शेळकेंसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश!*
=====================
बीड, प्रतिनिधी- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या उंबरठ्यावर बीडच्या राजकारणात जबरदस्त उलथापालथ झाली असून बीड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते ना. एकनाथजी शिंदे साहेब, संसदरत्न खा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या कुशल कार्य प्रणालीला प्रभावित होऊन शिवसेना जिल्हाप्रमुख सन्माननीय अनिलदादा जगताप यांच्या माध्यमातून बीड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील शेकडो महत्वपूर्ण पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. काल, दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 9. 00 वाजताच्या दरम्यान मुंबईतील मुक्तागिरी निवासस्थानी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे स्वीय सहाय्यक अत्यंत विश्वासू व खंदे समर्थक म्हणून सर्वश्रुत असणारे सतीष जगन्नाथ शेळके, कैलास रमेश घल्लाळ (सरपंच), अजिज चाँद शेख (उपसरपंच), प्रफुल्ल हनुमंतराव पाठक,  किरण शिवाजीराव शिंदे, रोहित श्रीराम जाधव, सुरेश शिवाजीराव खुरणे (उपसरपंच),  गणेश आनंदराव भरनाळे,  महेश भगवान कदम, संदीप फल्हाद नवले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा लक्षवेधी प्रवेश सोहळा पार पडला. या महत्वपूर्ण प्रवेश सोहळ्याने बीड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हादरला असून आगामी निवडणुकांत राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत व शिवसेनाची पकड आणखी मजबूत झाली आहे. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्यासह जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आणि जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर उपस्थित होते.
*चौकट-*
*शिवसेना हा मालक-नोकरांचा नाही, कार्यकर्त्यांचा पक्ष- उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे*
 “शिवसेनेवर विश्वास ठेवून आपण आलात. आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे,  एकनाथ शिंदे दिलेला शब्द म्हणजे पाळलेलं वचन आहे. आपण सर्वजण तळागाळातील शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आणण्यासाठी शिवसेनेत आलात. शिवसेना हा मालक-नोकरांचा नाही, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आपलं सर्वांचं शिवसेनेत मनापासून स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.” असे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब प्रवेश सोहळ्या दरम्यान म्हणाले.
°°°°°
Back to top button