संपादकीय

ओमिक्रॉनशी लढण्याकरता मुंबई सज्ज, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची ग्वाही

 

मुंबई | कोरोना संसर्गाने संपूर्ण जगाला मागच्या दोन वर्षांपासून विळखा घातला आहे. हाय संसर्गाचा धोका कमीकमी हळू होत असं वाटतं असतानाच आता ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. दरम्यान हा नवा व्हायरस मुंबईत येण्यापूर्वीच याच्याशी दोन हात करण्याकरता मुंबई पालिका सज्ज झाली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी प्रसिद्ध मराठाच्या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे.

चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून ११२६ प्रवासी आतपर्यंत मुंबई विमानतळावर उतरले आहेत. त्यामुळे या सर्वांचं लोकेशन ट्रॅक करणं सध्या सुरु आहे. त्यातील १०० जण मुंबईतील असून इतर मुंबईच्या आसपासच्या आणि इतर जिल्ह्यांतील आहेत. तत्पूर्वी पर्यटन मंत्री आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा काल दक्षिण आफ्रिकेतून काही प्रवाशी मुंबईत दाखल झाल्याचे वृत्त बोलून दाखविले होते.

दरम्यान यांना ट्रॅक केल्यानंतर त्यांची कोविड टेस्ट करुन पॉझिटीव्ह आढळल्यास जिनोम सिक्वेंसिंगही केलं जाणार आहे. तसंच दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या विमानांबाबत निर्णय घेऊन संस्थात्मक विलगीकरणाची नवी पॉलिसी केंद्रानं बनवावी अशी विनंतीही केंद्राकडे केल्याची माहिती चहल यांनी दिल्या.

Back to top button