बीड

श्रीराम नवमी निमित्त जामखेडमध्ये सकल हिंदू समाजातर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन

श्रीराम नवमी निमित्त जामखेडमध्ये सकल हिंदू समाजातर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन

डमरू पथक, अघोरी पथक, पारंपरिक वाद्यांचा गजर; शिवप्रेमी, रामभक्तांना सहभागाचे आवाहन

जामखेड | प्रतिनिधी:-रामनवमी उत्सवानिमित्त सकल हिंदू समाज जामखेड तालुका यांच्या वतीने सोमवार, दि. ८ एप्रिल रोजी जामखेड शहरात भव्य-दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड) येथून सायंकाळी ५ वाजता या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे.

या शोभायात्रेमध्ये घोडे, लेझीम, हलगी, छत्रपती शिवाजी महाराज व श्रीराम यांच्या मूर्ती, कोल्हापूर येथील प्रसिद्ध साउंड डमरू पथक, अघोरी पथक, ध्वज पथक, तसेच पारंपरिक वाद्यांचे पथक सहभागी होणार आहे. संपूर्ण मार्गावर उत्साहपूर्ण वातावरण व भक्तिरसाने न्हालेली सजावट पाहायला मिळणार आहे.

शोभायात्रेच्या माध्यमातून रामनवमीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आणि हिंदू एकतेचा जागर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या उत्सवात हिंदू बांधव, शिवप्रेमी, रामभक्त यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदू समाज, जामखेड तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button