खर्डा येथे आषाढी एकादशीनिमित्त भाजप युवा मोर्चाच्यावतीने फराळाचे वाटप

खर्डा येथे आषाढी एकादशीनिमित्त भाजप युवा मोर्चाच्यावतीने फराळाचे वाटप
संत सिताराम बाबा गडावर ६० ते ७० हजार भाविकांना सेवा
जामखेड प्रतिनिधी –पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील खर्डा गावात, संत सिताराम बाबा गडावर आलेल्या हजारो भाविकांना भाजप युवा मोर्चाच्या वतीने भाविक भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी अंदाजे ६० ते ७० हजार भाविकांनी उपस्थित राहून गडाचे दर्शन घेतले.
या उपक्रमात भाजपच्या खर्डा गटाने भाविकांना केळी व फराळाचे वाटप करून त्यांची सेवा केली. भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांनी सांगितले की, “सर्वांना प्रत्यक्ष पंढरपूरला जाता येतेच असे नाही; म्हणून देव आपल्या मनात आहे, ही भावना ठेवून आम्ही हा उपक्रम राबवला.”
कार्यक्रमावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवि सुरवसे, नानासाहेब गोपाळघरे, भास्कर गोपाळघरे, ग्रामपंचायत सदस्य सोपान गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, राजू मोरे, बापूसाहेब ढगे, महालिंग कोरे, महेश दिंडोरे, एकनाथ गोपाळघरे, शाम सकट, प्रशांत कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाविकांसाठी पोषणदायक आणि वेळेवर फराळ उपलब्ध करून देत या सेवाभावी उपक्रमामुळे यात्रेचा आनंद द्विगुणित झाला. गडावरून एसटी स्टँडपर्यंत लागलेल्या रांगेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे सेवा कार्य सुरू ठेवले होते.



