बीड
पिंपळनेर,पेंडगाव, मांजरसुंभा याठिकाणी शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास सुरावात

पिंपळनेर,पेंडगाव, मांजरसुंभा याठिकाणी शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास सुरावात
सदस्य नोंदणीस प्रचंड प्रतिसाद
शिवसंग्रामचे पन्नास हजार प्राथमिक आणि दहा हजार सक्रिय सदस्य तयार करण्याचे उद्दिष्ट – डॉ. ज्योती मेटे
बीड (प्रतिनिधी):-शिवसंग्राम सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष डॉ ज्योती विनायकराव मेटे यांच्या सुचनेनुसार बीड जिल्ह्यात १ मे पासून सुरू असलेल्या सभासद नोंदणी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दी. १४ मे आणि १७ मे रोजी पिंपळनेर, बहीरवाडी सर्कल आणि नेकनुर सर्कल येथील पिंपळनेर,पेंडगाव, मांजरसुंभा येथे सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले यात तिन्ही ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत शिवसंग्राम चे प्राथमिक सदस्य होता आहेत. यात पेंडगाव आणि मांजरसुंभा येथील सदस्य नोंदणी अभियानास डॉ. ज्योती मेटे यांनी हजेरी लावत सदस्य नोंदणीचा उत्साह वाढवला.
उपस्थित पदाधिकाऱ्यांना सभासद नोंदणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले तसेच मोठ्या उत्साहात अभियानाचे संपूर्ण नियोजन करून सदस्य नोंदणी अभियानाला शुभारंभ करण्यात आला. समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांचा सदस्यता नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आगामी काही दिवसात पन्नास हजार प्राथमिक सदस्य आणि दहा हजार सक्रिय सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शिवसंग्रामचे संस्थापक लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्या जयंती पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी शिवसंग्राम चे पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्हा ,तालुका, सर्कल आणि गावोगावी काम करत आहेत. असे प्रतिपादन याप्रसंगी डॉ. ज्योती मेटे यांनी केले.
यावेळी यावेळी शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष जाधव, सरचिटणीस अनिल घुमरे, शहराध्यक्ष सुहास पाटील,उपाध्यक्ष सचिन कोटुळे, तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पंडितराव माने, पंचायत समिती मा. सभापती ज्ञानेश्वर कोकाटे,संचालक सचिन काळकुटे, खरेदी विक्री संघाचे संचालक गोपीनाथ घुमरे, युवक जिल्हाध्यक्ष सुनील कुटे, धर्मराज मागदे सर, सुनील शिंदे, राजेंद्र आमटे , कचरू महाराज कदम, राजेश्वर सातपुते, मा. पं. स.सदस्य किशोर काळकुटे, सरपंच सोमनाथ पवार,उपसरपंच चद्रकांन्त कोसले,
कृष्णा भागडे, श्रीराम घोडके, जीएस चौधरी, अजिंक्य जगदाळे, जगन्नाथ घोडके ,महारुद्र वाणी, शेख नासिर, संतोष चौधरी, गणेश चौधरी, विशाल रसाळ, सखाराम काळकुटे, जालिंदर सावंत, गणेश कदम ,अमोल सावंत, कृष्णा सावंत ,सुभाष काळकुटे, दत्ता जगदाळे, गणेश जगदाळे ,अतुल बडगे ,सतीश कागदे आदी उपस्थित होते.


