बीड बालरंगभूमी परिषदेच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त अथर्वशीर्ष पठणाच्या उपक्रमाचे आयोजन.

बीड (प्रतिनिधी) येथील बालरंगभूमी परिषद बीड शाखेच्या वतीने गणेश उत्सवाचे औचित्य साधून लहान मुलांवर उत्तम संस्कार होण्यासाठी अथर्वशीर्षाचे पठण हा उपक्रम दिनांक चार सप्टेंबर रोजी राबवत आहे यामध्ये बीड मधील सर्व शाळांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन बीड नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर यांनी केले आहे.
बीड येथील सौ के एस के महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये दिनांक चार सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता गणेश उत्सवाचे औचित्य साधून अथर्वशीर्ष पठण उपक्रम राबविण्यात येणार आहे यासाठी बीडमधील शाळा सहभाग नोंदवणार असून एकत्रित अथर्वशीर्ष पठण होणार आहे भारतीय संस्कृती, परंपरा याची माहिती मुलांना असावी त्याच्यांवरती उत्तम संस्कार व्हावे, या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रभर विविध उपक्रम बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष नीलमताई शिर्के- सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून बीडमध्ये सामूहिक अथर्वशीर्ष पठण होणार आहे.
या उपक्रमास 1 ते 15 वयोगटातील जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन बीड बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष तथा बालरंगभुमी परिषदेच्या उपाध्यक्ष दीपा क्षीरसागर , संजय पाटील देवळाणकर, स्नेहल पाठक, अनुराधा चिंचोलकर, विलास सोनवणे, दीपक जमदाडे, दुष्यंता रामटेके, मिलिंद शिवनीकर, नामदेव साळुंखे, अमित गाडे, बाबासाहेब कांबळे राहुल सोनवणे, सुरेश थोरात, सुरेश साळुंखे, सिद्धार्थ अग्रवाल, विजयकुमार राख, असलम शेख, रोहित पुराणीक, दीपक गिरी यांनी केले आहे


